वकिलाला सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

भिवंडी


भिवंडी दि.१७ एका अशिलाला न्याय मिळवून देण्याकरीता तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या वकिलाला पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबई बोरिवली पोलीस ठाण्यातून गुरुवारी समोर आली आहे.या घटनेच्या निषेधार्थ भिवंडी वकील संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

घटनेचे अधिक वृत्त असे की,ऍड.पृथ्वीराज झाला हे त्यांच्या अशिलांसोबत बोरिवली पोलीस ठाण्यात गेले ,त्यावेळी बोरीवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गीते यांनी पृथ्वीराज झाला यांना अमानुष मारहाण केली आहे.त्यामुळे ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीतील वकिलांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले आहे.या निवेदनाद्वारे भिवंडीतील वकिलांच्या वतीने भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी मागील अनेक वर्षांपासून वकिलांच्या संरक्षणाकरिता बनवण्यात आलेल्या अधिवक्ता संरक्षण कायद्याची अंमलबजावणीची तसेच वकिलाला मारहाण करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी भिंवडी वकील संघटनेचे माजी अध्यक्ष हर्षल पाटील, सेक्रेटरी ऍड.जितेंद्र पाटील, खजिनदार ऍड.समिर पाटील,ऍड.दिनेश्वर पाटील,ऍड.शशिकांत गोतारणे आदींनी केली आहे.तर यावेळी ऍड.शिरिष बोरकर,गणेश काबूकर,नसिम मोमीन,दिपेश भोईर,कल्पेश ठाकूर, यूवराज पाटील,सिध्दार्थ भोईर,निवूत्ती कथोरे,प्रविण शेलार,वैभव भोईर,संतोष भोईर,प्रदीप मते आदी वकील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *