माणसाला प्रगल्भ व परिपूर्ण.   करणारा वाचनाचा छंद

लेख

माणसाला प्रगल्भ व परिपूर्ण.   करणारा वाचनाचा छंद
    लेखक _ निलेश किसन पवार    अनगाव ,
तालुका_ भिवंडी.  जिल्हा _ ठाणे.
 
सर्व प्रथम आपल्या सगळ्यांना
  वाचन प्रेरणा दिनाच्या खूप  खूप शुभेच्छा.
      आज 15 ऑक्टोबर ’वाचन प्रेरणा दिवस’ आहे. भारताचे माजी राष्ट्रपती ,
थोर शास्त्रज्ञ प्रचंड पुस्तक प्रेमी असलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन
म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने वाचनाचे महत्व आणि फायदे सांगणारा लेख.
     
      ’ वाचाल तर वाचाल ’ हा सुविचार आपल्याला माहितच आहे. त्याचा अर्थ असा , जर तुम्ही पुस्तके वाचाल
तर तुम्ही जीवनात वाचाल म्हणजे तरुन जाल. मुळातच वाचन ही खूप चांगली सवय आहे. वाचन करण्याचे असंख्य फायदे आहेत. वाचनातून माणसाला चांगले विचार , प्रेरणा , स्फूर्ती , आत्मविश्वास आणि सकारात्मकता या अमूल्य गोष्टी प्राप्त होतात. वाचन हे मेंदूसाठी उत्तम टॉनिक आहे. वाचनाने माणसाचा मेंदू
तेज , तरतरीत , तल्लख आणि
ताजा तवाना राहतो. बुद्धीला धार चढते , स्मरण शक्ती तल्लख बनते.
  वाचन केल्याने माणसाची वैचारिक पातळी उंचावते आणि बौद्धिक सामर्थ्य ही वाढते. वाचनामुळे आपल्या जाणिवा समृद्ध होतात.
   वाचन करणारी माणसे टेन्शन फ्री
  आनंदी आणि उत्तम आयुष्य जगतात. एकूणच काय तर वाचनाच्या छंदामुळे माणूस समृद्ध, प्रगल्भ व
सर्व गुणसंपन्न बनतो.
            आपल्या जीवनात पुस्तकांचा खूप मोठा आणि महत्वाचा वाटा असतो. पुस्तक हा आपला चांगला मित्र , गुरु आणि मार्गदर्शक असतो.
जसा जेवणात मीठ आवश्यक आहे तसाच जीवनात पुस्तके आवश्यक आहेत. पुस्तके माणसाची मस्तके समृद्ध करतात. पुस्तके आपल्याला मौलिक विचारधन देतात.
     भारतातील अनेक मोठी आणि यशस्वी माणसे उत्तम वाचक होती.
स्वामी विवेकानंद , महात्मा गांधी ,
लोकमान्य टिळक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , डॉ . ए. पी. जे. अब्दुल कलाम या सर्वांचे वाचन अफाट होते.
महात्मा गांधी सांगायचे , या जगातील सर्वाधिक मौल्यवान रत्न म्हणजे पुस्तक. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सांगतात , एक चांगले पुस्तक 100
मित्रांच्या बरोबरीचे असते.
       पुस्तके माणसाला अंधारातून प्रकाशाकडे , निराशेकडून आशेकडे आणि अपयशाकडून यशाकडे घेऊन जातात. पुस्तके आपल्या बुद्धीला गंज लागू देत नाहीत तसेच आपल्याला वाईट मार्गाला आणि अधोगतीला जाऊ देत नाहीत. पुस्तके माणसाला हुशार , बुद्धिमान , समजदार बनवतात ही पुस्तकांची सगळ्यात मोठी देणगी आहे.
   म्हणून आपण सगळ्यांनी कायम वाचत राहावे आणि समृद्ध होत रहावे.
                📖  धन्यवाद 📖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *