भिवंडी दि.१० ( गावकरी TODAY NEWS ) शहरातील न्यू कणेरी येथील पन्ना कंपाऊंड मध्ये टोरंट पावरच्या केबल चोरी प्रकरणी दोघांच्या विरोधात कुंभारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.मोहम्मदला अली नसिरुद्दीन सिद्दीकी आणि नदीम मोहम्मद सलीम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,४ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी मो. अली आणि नदीम मो.या दोघांनी आपसात संगनमताने टोरंट पावरच्या ४० मीटर वीज केबल चोरीची घटना घडली होती.याप्रकरणी टोरंट कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून कुंभारवाडा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.त्यानुषंगाने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोहम्मदला अली नसिरुद्दीन सिद्दीकी आणि नदीम मोहम्मद सलीम यांना टोरेंट पॉवर लिमिटेडच्या केबल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून आरोपींना भिवंडी सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
