भिवंडीत टॉरेंट पॉवरच्या वतीने 26/ मार्च 2025 रोजी सायंकाळी बालाजी बॅक्वेट हाॅल अजूरफाटा येथे भव्य रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर व्यक्तीमत्व, राजकीय नेते, समाजसेवक पत्रकारांसह भिवंडी पोलिस उपायुक्त आणि पोलिस उपायुक्त परिमंडळ – २ च्या अखत्यारीतील पाचही पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक आदींसह टोरंट पावरचे अधिकारी,स्नेहल देसाई उपाध्यक्ष जीवन क्लर्क उपाध्यक्ष अभिजित काळे उपाध्यक्ष सुधीर देशमुख तसेच चेतन बदियानी जनसंपर्क अधिकारी टोरंट कर्मचारी उपस्थित होते.




या इफ्तार पार्टीमध्ये विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती. *उपस्थित मान्यवरांनी सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देत टॉरेंट पॉवरच्या या उपक्रमाचे कौतुक केले* .टॉरेंट पॉवर भिवंडीने या इफ्तार पार्टीद्वारे समाजातील विविध स्तरांमधील लोकांना एकत्र आणत संवाद आणि सौहार्दाचा एक सुंदर आदर्श उभा केला आहे.