भिवंडी:दि.04 मार्च [ गावकरी TODAY NEWS ] माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांनुसार कोनगाव येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात आयुष्मान भारत योजनेत ७० वर्षांवरील नागरिकांचा समावेश करण्याबरोबरच नवीन मतदारांचीही नोंदणी करण्यात आली.भाजपा, कोनगाव, कपिल पाटील फाउंडेशन आणि शिवचेरोबा सामाजिक संस्थेच्या वतीने कोनगाव येथील आरोग्य केंद्रात सोमवारपासून शिबीर भरविण्यात आले होते.

या शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना सहजपणे व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.या शिबिरातील गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच मोफत चष्मे वाटपही करण्यात आले.या शिबिराला भेट देऊन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी सरपंच रेखा पाटील, माजी सरपंच टी.आर. पाटील,चंद्रकांत पाटील,भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील,राजू म्हात्रे, रेखा मुकादम,चारुदत्त पाटील,हनुमान म्हात्रे,बाळू पाटील,भरत जाधव,संतोष पाटील,अरुण पाटील आदी उपस्थित होते.एस.एस.हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिरात विविध आजारांवर नामांकित डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांकडून शिबिराचा लाभ घेण्यात आला या शिबिराचे मुख्य आयोजक हनुमान म्हात्रे, राजू म्हात्रे आणि प्रमोद पाटील यांनी केले होते.