भिवंडी दि.२८( गावकरीTODAY NEWS ) विविध क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत खेळाडूंचा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करून शाल पुष्पगुच्छ तसेच सर्टिफिकेट आणि सन्मान निधी देऊन सत्कार करण्यात आला.

यामध्ये मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत खेळणाऱ्या भिवंडी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत निवड झालेली काल्हेरची सुपुत्री कु.विजया सुनिल पाटील,सोनाळे गावातील वेदिका सुनिल पाटील, भादवड येथील अनुष्का टेमघरे,गोवे गावातील कु.सागर कृष्णा डिंगोरे,कोनगावचा प्रणय बाळाराम पाटील तसेच पुढील श्रीलंका येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झालेल्या अंजूरचा आकाश अनिल पाटील आदींसह ३८ व्या नॅशनल गेम भारतीय ऑलिम्पिक स्पर्धा उत्तराखंड येथे महाराष्ट्र संघातून सहभागी होऊन ट्रायथलॉन क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव लौकिक करणाऱ्या पिंपळघर गावची जलपरी कु.डॉली देविदास पाटील हिचा विशेष सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील,उप सभापती मनेश म्हात्रे,संचालक श्रीराम पाटील,विष्णू पाटील,संजय पाटील,शरद पाटील,अनंता पाटील, मोहन म्हणेरा,ज्ञानेश्वर पवार,महेंद्र पाटील,सुरेश कोळपे, जयदास भगत,सागर देसक,मीराबाई गायखे,निलम पाटील ,सचिव यशवंत म्हात्रे तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बाजार समितीच्या वतीने सर्व खेळाडूंना भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.