गावकरी TODAY न्यूज नेटवर्क
भिवंडी जे.एस.के.ए महाराष्ट्रच्या विर्थ्यांनी ४७व्या जेएसकेए आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभाग घेत चमकदार कामगिरी केली आहे. ही स्पर्धा व्ही.के.एन मेनन इनडोअर स्टेडियम थ्रिशूर केरळ येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ६ देशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत जेएसकेए डोंबिवली सी.एम.एस शाळा डोंबिवली तील विध्यार्थी कुशल शर्मा ह्याने द्वितीय स्थान मिळवले तर शौनक परब आणि मयंक शर्मा ह्यांनी तृतीय स्थान मिळवून शाळेचे नाव लौकिक केले आहे.
यावेळी पदकप्राप्त विद्यार्थ्यांनी जेएसके भारताचे प्रमुख पी.के गोपाळकृष्ण, जेएसकेए राज्य प्रमुख सेन्साई भोळेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत विजय प्राप्त केले असून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
