देशात सर्वत्र २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाही व्यवस्थेत निवडणूक हा महत्वाचा घटक आहे, त्यामुळेच निवडणूक मुक्त, निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. सध्याच्या काळात आयोगाकडून ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली जात नाही असा काँग्रेसचा आक्षेप आहे.या विरोधात देशभर काँग्रेस कडून आंदोलन केले जात असताना ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार अभिजित खोले यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला आहे.यावेळी जिल्हा पदाधिकारी पंकज गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मतदान प्रक्रियेविषयी मतदारांच्या मनात संशय निर्माण झाला असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.लोकशाहीच्या रक्षणासाठी व मतदारांच्या मतदानाच्या पवित्र हक्काच्या जपणुकीसाठी काँग्रेस ही मोहिम करत असल्याचे दयानंद चोरघे यांनी स्पष्ट केले आहे.
