प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर जल हर घर नल या योजने अंतर्गत जलजीवन मिशन योजना राबवली जात असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. भिवंडी तालुक्यात 197 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविली जात असून त्यासाठी सुमारे 238 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.परंतु या पैकी असंख्य कामे अर्धवट असून सुरू असलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत श्रमजीवी संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर हिशोब आंदोलन सुरू केले आहे.संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील लोणे,शहराध्यक्ष सागर देसक यांच्या नेतृत्वा खाली होत असलेल्या या आंदोलनात जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद पवार,मुकेश भांगरे,महेंद्र निरगुडा,आशा भोईर यांसह शेकडो महिला हांडे घेऊन सहभागी झाल्या आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा संबंधित यंत्रणे कडून हिशोब घेतल्या शिवाय या ठिकाणहून आम्ही उठणार नसून,
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारां विरोधात कारवाई करण्याची आमची मागणी असून प्रजासत्ताक दिन याच ठिकाणी साजरा करणार असा निर्धार तालुका अध्यक्ष सागर देसक यांनी व्यक्त केला आहे.