शिक्षणमहर्षी शिवाजीराव जोंधळेंची  संपत्ती हडपण्यासाठी बनावट मृत्यूपत्र तयार करणाऱ्या सावत्र भावांसह  वकील, डॉकटर अश्या  6 जणांवर  गुन्हा दाखल

ठाणे



ठाणे   :जिल्ह्यात  शिक्षणमहर्षी म्हणून नावाजलेले दिवंगत  शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तां हडप करण्यासाठी  बनावट मृत्युपत्र  तयार करणाऱ्या सावत्र आई व सावत्र भावांसह  वकील, डॉकटर अश्या  6 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे तक्रारदार महिलेसह तिच्या कुटूंबाची  संपत्ती हडप करण्यासाठी हत्या केली  जाणार असल्याचा दावा करत  मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे  कुटूंबाच्या सुरक्षासह न्यायाची मागणी शहापूर तालुक्यातील  आसनगाव येथे  दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत  केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार दिवंगत  शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख ( वर्षा शिवाजीराव जोंधळे)  या आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्ट च्या अध्यक्ष असून त्यांच्या माध्यमातून आसनगाव येथील महाविद्यालयात  हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  तक्रारदार वर्षा ह्या  शिवाजीराव जोंधळे यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी असल्याचे सांगत त्या कायदेशीर वारस असल्याचे मुंबई सिटी सिव्हिल कोर्टने सिद्ध झाले असतानाच,  वर्षा यांच्या माहितीनुसार   शिवाजीराव जोंधळे यांचे  19 एप्रिल 2024  रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर  त्यांच्या पहिल्या पत्नी, त्यांची दोन मुले यांनी त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जबरदस्ती करित कट कारस्थान रचण्यास  सुरवात केली. विशेष म्हणजे  दिवंगत  शिवाजीराव यांच्या नावे असलेल्या अनेक शेतजमिनी नावावर करण्यासाठी एका मृत्यूपत्राच्या आधारे वारस लावण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र  वर्षा यांनी असे कुठलेही मृत्यूपत्र वडिलांनी तयार करून ठेवल्याचे त्यांना सांगितलेले नसल्याने त्यांना हे मृत्यूपत्र बनावट  असल्याचा संशय आला.

मृत्यूपत्र बनावट  असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी 13 मार्च 2024 ला हे नोंदणीकृत मृत्यूपत्र नॉटरी केल्याचे लक्षात आले  मात्र त्यावर असलेली सही ही बनावट  असल्याचे देखील वर्षा यांच्या लक्षात आले. तसेच वडिलांचा 13 मार्चचा मोबाईल लोकेशनचा डेटा मागवलं असता शिवाजीराव जोंधळे हे 13 मार्च रोजी मुबंई फोर्ट परिसरात गेले असल्याचे निदर्शनास आले नाही.  त्यानंतर हा सर्व प्रकार आझाद मैदान पोलीस ठाण्यात हद्दीत घडल्याने  वर्षा देशमुख यांनी 31 ऑक्टॉबर रोजी   आझाद मैदान पोलीस ठाण्यात धाव घेऊन वडिलांचे  मृत्यूपत्र बनवून त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न सुरु असल्याबाबतची तक्रार पोलिसांना दिली. आझाद मैदान पोलिसांनी  पुरावे आणि तांत्रिक बाबीची तपासणी करून सदरचा मृत्यूपत्र, नॉटरी वकील, फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर, तसेच वर्षा  यांची सावत्र आई, 2 सावत्र भाऊ, 2 साक्षीदार यांची चौकशी केली असता पोलिसांना देखील हे मृत्यूपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती वर्षा देशमुख यांनी दिली आहे.

  दरम्यान, बनावट मृत्यूपत्र बनवून शिवाजीराव जोंधळे यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी  संशयीत त्यांची पहिली पत्नी  वैशाली जोंधळे, मुलगे सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, ऍड निलेश मांडवकर, नोटरी वकील टी. सी. कौशिक, फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते, मृत्यूपत्राचे साक्षीदार किशोर जोंधळे, चैतन्य बडवर यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम  420 , 465 , 467 , 468, 471 ,120 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास करणारे साहाय्यक पोलीस निरिक्षक शहा यांच्याशी संपर्क साधला असता तक्रारदार वर्षा देशमुख यांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल केला असून या   गुन्ह्याच्या अनुषंगाने  पोलीस पथकाकडून  तांत्रिक पुराव्याची तपासणी सुरू असून लवकरच या गुन्हयातील तपासणी अंती सत्यता समोर येणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले
सागर जोंधळे यांच्याशी संपर्क साधला असता माझ्यासह  माझ्या कुटुंबावर अक्सपोटी मनात राग धरून हा गुन्हा दाखल केला आहे
वर्षा देशमुख यांची आई यांच्यासोबत माझ्या वडिलांचे लग्न झालेच नसून यांच्यावर विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने त्याचा सूड उगवण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचे सागर जोंधळे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *