जमिनीच्या वादातून डॉक्टरला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बाप लेकावर गुन्हा दाखल

ठाणे

ठाणे : जमिनीच्या वादातून एका डॉक्टरला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मोहने गावाच्या हद्दीत घडला असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या बाप लेकावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत पोलिसानं तपास सुरू केला आहे. जयदीप पाटील व त्यांचे वडील देविदास पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या बाप लेकाची नावे आहेत. तर डॉ. अनुदुर्ग बाबुराव ढोणी ( वय ४४) असे तक्रारदाराचे नाव आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, मोहना गाव आंबिवली येथे राहणारे डॉ.अनुदुर्ग बाबुराव ढोणी हे मोहने बाजारपेठ येथे गणपती नर्सिंग होम या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. त्यांनी मौजे मोहने येथील सुरेश शांताराम पाटील व इतर यांच्याकडून २०० चौरस मीटर जमीन २८ नोंव्हेंबर २०१९ रोजी लक्ष्मी राजाराम कोट व इतर यांच्याकडून विकत घेतली तर या जमिनीला लागूनच
देवकुबाई आत्माराम पवार व इतर यांच्याकडून २१ एप्रिल २०१६ रोजी अशी एकूण ५०० चौरस मीटर जमीन खरेदी केलेली आहे. सदरील जमीन हि ऍग्रीकल्चर असल्याने डॉ.अनुदुर्ग धोनी यांनी कल्याण तहसीलदार कार्यालयात अर्ज करून कायदेशीर प्रक्रिया करून १३/६/२०२२ रोजी उपाधीक्षक भूमिअभिलेख यांचे कडून टीएलआर करून घेतला असून जागेच्या खुणा निश्चित केलेल्या असून जागेवर बांधकामासाठी लागणारे साहित्य,सिमेंट पोल ठेवलेले असून सदरील जागेवर डॉक्टर धोनी यांचा ताबा आहे.

दरम्यान, डॉ. ढोणी हे २७ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी तारेचे व सिमेंट पोलचे कंपाउंड केल्याचे तसेचत्या जागेवर जयदीप देविदास पाटील यांनी सदरील मिळकत हि खाजगी मिळकत असून अतिक्रमण व बेकायदेशीर प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा बॅनर लावल्याचे दिसून आल्यावर डॉ.अनुदुर्ग ढोणी यांनी याबाबत जवळच उभे असलेल्या जयदीप पाटील व त्यांचे वडील देविदास पाटील यांना विचारणा केली असता दोघांनी जोरजोरात ओरडत अश्लील शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सदरील जागेवर पाय ठेवू नकोस म्हणून बजावले. याबाबत डॉ. अनुराग ढोणी यांनी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन जयदीप पाटील व त्याचे वडील देविदास पाटील यांच्या विरोधात रीतसर गुन्हा रजि नंबर ७९९/२०२४ बीएनएस ३२९(३),३५२,३५१(२),३(५) अनव्ये गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गुलाब कौतिक आढाव हे करीत आहेत.

याबाबत जयदीप पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,गेल्या 50 वर्षांपासून आमचा त्या जागेवर कब्जा असून डॉक्टरांना ज्या व्यक्तीने जागा विकली आहे त्या व्यक्तींना डॉक्टरांनी समोर घेऊन यावे व ती जागा त्यांची आहे हे सिद्ध करावे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *