विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असताना शिवसेना उ बा ठा पक्ष भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघासाठी आग्रही असून माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या साठी शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.भिवंडी जिल्हा मध्यवर्ती शाखेत आयोजित बैठकीत जिल्हा प्रमुख विश्वास थळे,शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे,उपजिल्हा प्रमुख प्रकाश भोईर,इरफान भुरे,महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे,यांसह मोठ्या संख्येने महिला युवासेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
या बैठकीत भिवंडी पूर्व शिवाय संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी रुपेश म्हात्रे यांची उमेदवारी उध्दव ठाकरे यांनी जाहीर करावी अशी एक मुखी मागणी करीत यासाठी मातोश्री वरील पक्ष प्रमुखांना एक संधी द्या नाहीतर रुपेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना निवडून आणा .नुसती भाषण करून काही होत नाही तसे केले तर पक्ष संपेल,पक्ष नेतृत्वाने पक्ष कमकुवत करायला घेतला असा त्याचा अर्थ होईल म्हणून सर्वांनी एकदा मातोश्रीवर जाऊन आपली भूमिका मांडून सामूहिक राजीनामे देऊन रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरावे अशी मागणी केली आहे.
बाईट :- इरफान भुरे – उपजिल्हाप्रमुख
पक्ष आमच्या मागणी कडे ठाम पणे दुर्लक्ष करीत आहे हा शब्दप्रयोग जरी बरोबर असला तरी आमच्या मागणी कडे पक्ष प्रमुख दुर्लक्ष करतात असा त्याचा अर्थ होत नाही.भिवंडी पूर्व विधानसभा उ बा ठा गटाकडे यावी यासाठी आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.रुपेश म्हात्रे दुर्दैवाने 2019 मध्ये काही मतांनी हरले म्हणून ही जागा समाजवादी पक्षाच्या वाट्याला जात असेल तर ते चुकीचे आहे. समाजवादी पक्षाने परस्पर पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.त्यामुळे त्यांचा महाविकास आघाडी सोबत संबंध नाही अशा परिस्थितीत रुपेश म्हात्रे यांची भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास जिल्हाप्रमुख विश्वास थळे यांनी व्यक्त केला आहे.
बाईट :- विश्वास थळे – जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण
