भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

भिवंडी



भिवंडी – भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांच्या उपस्थितीत 
पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक व चर्चा करून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.भिवंडी पश्चिम मतदार संघामध्ये लोकसभेच्या तुलनेत ४० हजार मतांची वाढ आज पर्यंत झाली असून पश्चिम मतदार संघात ऐकुन तीन लाख ३२ हजार ८५६ मतदार आहेत.मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात मतदानात ५ टक्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अभिजित खोले, सुदाम इंगळे, बाळाराम जाधव आदी उपस्थित होते.
          निवडणूक प्रक्रिया कालावधीमध्ये आचार संहिता काटेकोरपणे पालन व्हावं या साठी निवडणूक यंत्रणेकडून विशेष मोहीम राबविले जात आहे. शासकीय आस्थापनांसोबतच खाजगी ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर पोस्टर काढण्याबाबतच्या सूचना महापालिका व पंचायत समिती प्रशासनास  देण्यात आले असून ते वेळेमध्ये काढून घेतले जातील.तर भिवंडी मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय त्यासोबतच ई व्ही एम मतपेटी सुरक्षित ठेवण्यासाठीची स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्र कामतघर येथील वऱ्हाळा देवी माता मंगल कार्यालय या ठिकाणी असणार आहे.लोकसभा निवडणूक काळात या मतरदार संघात २ लाख ९२ हजार १०७ मतदार होते.यामध्ये १७ ऑक्टोंबर पर्यंत ४० हजार ७४९ मतदारांची वाढ झाली आहे.त्यामुळे आज रोजी ३ लाख ३२ हजार ८५६ मतदार आहेत. ज्यामध्ये १ लाख ८९ हजार ६४३ पुरुष,१ लाख ४३ हजार ५५ स्त्री,१५७ इतर ,१६ सैनिक मतदारांचा समावेश आहे.यामध्ये दिव्यांग १२०९ व ८५ वर्षांवरील वयोवृद्ध २२५६ मतदारांचा समावेश आहे.या विधानसभा मतदार संघात ७९ ठिकाणी ३०३ मतदान केंद्र असून लोकसभा निवडणूक काळात ५८ मतदान केंद्र मंडपात होती ती संख्या कमी झाली असून यावेळी मंडपात फक्त २१ मतदान मंडपात असणार आहेत.मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांसाठी विशेष लक्ष देवून पिण्याचे पाणी,बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.तर मतदान अधिक प्रमाणात व्हावे यासाठी विविध पातळीवर जनजागृती कार्यक्रम स्वीप यंत्रणे कडून विशेष मोहीम राबविली जाणार असून कारीवली,
नदीनाका व नारपोली या तीन ठिकाणी चेकपोस्ट असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *