भिवंडी ग्रामीणच्या ग्राहकांसाठी टोरेंट पॉवरचा संवाद कॅम्प संपन्न

भिवंडी


भिवंडी दि.१४( गावकरी प्रतिनिधी) टोरेंट पावरने नुकताच तालुक्यातील पूर्णा ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये २०० हून अधिक ग्राहकांनी सहभाग घेतला होता.दरम्यान या कार्यक्रमात टोरेंट अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या समस्येचे निराकरणासह पीडी ग्राहकांच्या महावितरणच्या थकबाकीसाठी विशेष व्याज माफी योजना, “महावितरण अभय योजना २०२४”, प्रलंबित कनेक्शन, विजिलेंस, बिल संबंधित आणि डिजिटल पेमेंट सेवा, नवीन वीज दर, आदी सारख्या मुद्द्यांवर ग्राहकांना माहिती दिली.यापूर्वी टोरेंटने भिवंडी शहरात अशा अनेक संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यामध्ये ३ हजाराहून अधिक ग्राहक सहभागी झाले होते.

या संवाद कार्यक्रमात टोरेंट पॉवरचे महाव्यवस्थापक अंकित साहा, बिनु सेतुमाधवन, राघवेंद्र राव, विजय राणे, जनसंपर्क अधिकारी मंदार घाणेकर, अमित कडू आदींसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी अनेक ग्रामीण आणि शहरी ग्राहकांनी टोरेंट पॉवरचा या संवाद कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देवून उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध विषयांची चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *