भिवंडी प्रतिनिधी अनिल गजरे
भिवंडी : आज आपण खऱ्या मानव रूपातील देवदूत नवदुर्गा म्हणजेच नाक,घसा,कान तज्ञ तथा भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक एम.एस.डॉ. माधवी पंधारे यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.कारण त्यांनी कोरोना महामारीच्या काळात घरादाराशी लांब राहून माणूस या नात्याने आपण समाजातील लोकांचे काही देणे लागतो म्हणून सतत ६ महिने रुग्णालयात रुग्णांची सेवा केली.आणि कोरोनाच्या कठीण काळातील कडू आठवणी सांगितल्या.त्याचप्रमाणे नकारात्मकतेमुळे डॉक्टर,नर्सेस यांच्यावर रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या हल्ल्यांबाबत पंधारे यांनी खंत व्यक्त करून डॉक्टरांसह रुग्णांनी नकारात्मक ऊर्जेवर मात करून सकारात्मक ऊर्जा अंगीकारने गरजेचे असून यासाठी अध्यात्म करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.तर देवदूत म्हणून रुग्णसेवा करत असतानाच त्यांनी स्वतःचे काही छंद जोपासून विविध बक्षीसांना गवसणी घालून प्रावीण्य मिळवले आहे.

माधवी पंधारे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर म्हणून जीवन जगत असताना मनातील ईच्छा कशा प्रकारे जपून ठेवल्या याबाबत प्रतिक्रिया दिली.तसेच विद्यार्थ्यांनी आपली कला,छंद कसे जोपासावेत याबद्दल ज्ञान दिले.यावेळी त्यांनी रुग्णसेवेतील धावपळीचे जीवन जगत असतानाच कुटुंबाच्या सहकार्याने फक्त विवाहीत डॉ. महिलांसाठीच्या मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र रॅम्प वॉक स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक मिळाल्याचे त्यांनी सांगितले.आणि त्यासाठी लागणारी पूर्वतयारी,प्रशिक्षण,डायट अशी मेहनत घेऊन यश प्राप्त केल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच त्यांना चित्रकला स्पर्धेसह विविध पारितोषिक मिळाली आहेत.यासह युवा पिढीला आणि विशेष म्हणजे महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की,स्त्रीवादी म्हणून नकारात्मक विचार न करता सकारात्मकतेच्या दृष्टीने जावून पुरुषांच्या तुलनेत असल्याची जाणीव पदा पदाला ठेवण्याचे आव्हान त्यांनी महिलांना केले.

तसेच स्वच्छ मनाने प्रबळ इच्छाशक्ती मनात ठेवून संसार ही करीयरच्या नाण्याची दुसरी बाजू आहे,असे समजून कुटुंबाला सोबत घेऊन चालल्याने कुटुंबही तुम्हाला मदत करेल असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी महिलांना दिला.तर स्वतः च्या आनंद स्त्रोतासाठी कुटुंबावर किंवा वरिष्ठांवर अवलंबून न राहता स्वतः छंद जोपासून स्वतःवर प्रेम करून आनंदी रहा असेही त्यांनी महिलांना उद्देशून सांगितले.

शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की,डॉक्टर,नर्स किंवा आरोग्य विभागातील कर्मचारी महिलांना फक्त रुग्ण सेवेतील महिला न समजता अष्टभुजेतील नवदुर्गे प्रमाणे बायको,बहीण,आई,कुटुंब असे विविध पात्र सांभाळणारी स्त्री म्हणून महिला डॉक्टर,नर्सेस अशा आरोग्य सेवेतील महिलांना मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास डॉक्टरांवरील हल्ले कमी होतील असे पंधारे यांनी स्पष्ट केले.
