मूक शांती मार्चला स्थगिती

भिवंडी



( गावकरी TODAY NEWS )

भिवंडी: गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व त्यानंतरच्या ईद-ए-मिलाद जुलूस दरम्यान झालेल्या हाणामारीनंतर शहरात निर्माण झालेल्या तणावा नंतर शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वधर्म समभाव मूक शांती मार्चचे आयोजन रविवारी दुपारी तीन वाजता ऍडव्होकेट किरण चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. मात्र शहरातील तणावपूर्ण शांतता विचारात घेऊन शांती मार्चमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रविवारी दुपारी तीन वाजता निघणारा मुक शांती मार्च स्थगित करण्यात आला असल्याची माहिती मूक शांती मार्चचे समन्वयक चन्ने यांनी दिली आहे.सध्या शहरातील वातावरण पाहता हा मूक शांती मार्च स्थगित करण्यात आला असून पुढील काही दिवसांमध्ये हा मूक शांती मार्च शहरातील शांततेसाठी व एकात्मतेसाठी काढण्यात येणार असल्याची माहिती देखील ऍड. किरण चन्ने यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *