भिवंडी जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे टोरंट पावर भिवंडी वतीने सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन
३०/०८/२०२४ रोजी राहनाळ येथील जिल्हा परिषद शाळा राहणाळ येथे विध्यार्थीना विद्युत पुरवठा करणाऱ्या वस्तू यावर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात ६० विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन कर्मचारी आणि टोरंट पॉवर चे अधिकारी सहभागी झाले होते या सत्रात विद्यार्थी तरुणांना विजेविषयी आवश्यक ज्ञान मिळावे हा उद्देश होता.

या सत्रात विजेशी संबंधित आवश्यक विषयांवर लक्ष केंद्रित केले गेले, विद्यार्थ्यांना त्याचा वापर आणि त्याच्याशी संबंधित संभाव्य धोक्यांबद्दल मूलभूत माहिती प्रदान करण्यात आली दैनंदिन जीवनात विद्युत उपकरणे सामुग्री वापरले जातात त्याची सुरक्षा म्हणून विद्युत उपकरणे वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
विद्युत पुरवठा करणारे उपकरणे तसेच तंत्रावर चर्चा, विद्यार्थ्यांना घरी आणि शाळेत ऊर्जा बचत पद्धतीचा वापर कसा करावा आणि त्याचे फायदे या बाबत माहिती देण्यात आली तर आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केलं या सत्रातील प्रमुख वैशिष्ट्ये ठरली ती टोरेंट पॉवरच्या अधिकाऱ्यांनी रेसिड्यूअल करंट सर्किट ब्रेकर्स (आरसीसीबी) चे महत्त्व
समजावून सांगितले हे उपकरण विजेचे धक्के कसे रोखू शकते आणि आपला जीव वाचवू शकतो त्याची माहिती देण्यात आली
विद्यार्थी आणि तोरण पावर कर्मचारी यांच्या संवाद सत्रामुळे विद्यार्थ्यांना सक्रियपणे प्रश्न विचारण्याची आणि प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली, त्या मुळे विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी वेगळे शिक्षण अनुभव आनंददायक झाला. जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन शिक्षक आणि टोरंट पॉवरचे कर्मचारी यांनी सुरक्षिततेसाठी जनजागृती केली ..