भिवंडीत अनाधिकृत नळ जोडणी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

भिवंडी

भिवंडी: शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असतानाच शहरात अनेक ठिकाणी अवैध्य नळ जोडणी केल्याची प्रकरणे समोर येत असल्याने मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी अनधिकृत नळ जोडणी करणाऱ्या इसमानविरोधात गुन्हा दाखल करण्याची मोहीम सुरू केली असून सोमवारी अनधिकृत नळ जोडणी करणाऱ्या इसमाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिंटू फारुक शाहा रा.गायत्री नगर असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे आहे. त्याने भिवंडी महापालिकेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून अर्धा इंच व्यासाचे दोन नळ कनेक्शन अनधिकृत घेतले होते. हे अनधिकृत नळ घेताना त्याने मनपाच्या सार्वजनिक रस्ता फोडून मनपा रस्त्याचे १० हजार रुपयांचे नुकसान करून जलवाहिनीचे २० हजार रुपयांचे नुकसान केले तर १५ हजार रुपयांची पाणी चोरी केली असल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिकेचे एकूण ४५ हजार ८० रुपये नुकसान झाल्याने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे विराज भोईर यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात मिंटू विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *