भिवंडी सह शिळ मुंब्रा कळवा परिसरात वीज वितरण करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्या कार्यक्षेत्रात वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मिटर संदर्भात सर्वेक्षण केले जात असल्याच्या अफवा समाज माध्यमांवर पसरविल्या जात आहेत .या अफवा खोट्या असून त्यांना वीज ग्राहकांनी बळी पडू नये असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे. टोरंट पॉवर प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्या संदर्भात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत.व घरातील महिलांच्या स्वाक्षऱ्या घेत असल्याचे मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.ही बाब चुकीची असून टोरंट पॉवर कंपनी कडून असे कोणतेही सर्वेक्षण सुरू नसल्याची माहिती कंपनीच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.कंपनी तर्फे असे कोणतेही सर्वेक्षण सुरू केलेले नाही.तरी वीज ग्राहकांनी दिशाभूल करणाऱ्या खोट्या अफवांना बळी पडू नये वीज ग्राहकांची कोणतीही समस्या अथवा तक्रार असल्यास त्यांनी थेट कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करावा असे आवाहन जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी केले आहे.
