जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम *”वाढदिवस फक्त निमीत्त…उद्देश मात्र सामाजिक दायित्व…” या संकल्पनेखाली कल्याण तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम* *भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ संस्थेचा स्तुत्य उपक्रम* जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने निलेश सांबरे यांच्या भगिनी तसेच भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुक्यातील २३ ठिकाणी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आपण लोकसभेत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत असल्याचे सांबरे यांनी याप्रसंगी बोलाताना सांगितले .नुकत्याच पार पडलेल्या लोसाभा निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून उभे होते. या निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला असला तरी देखील अपक्ष उमेदवार असतानाही त्यांना मते ही लक्षवेधी होती .

सुज्ञ असलेल्या मतदारांनी सांबरे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा कौल त्यांना दिला होता म्हणूनच अश्या लोकांच्या मतांचा आदर राखून आपण पराभव झाला असला तरीही लोकसभा निवडणुकीत जे आश्वासन मी जनतेला दिले होते त्याची पूर्तता करण्याच्या उद्देश्याने आजचे हे उपक्रम चालू केले आहेत. तसेच यापुढेही असे अनेक उपक्रम जनतेच्या सेवेत चालू राहतील . केवळ निवडणूक लढवणे हा हेतू कधीच नव्हता जनतेची कामे योग्यरीत्या झाली पाहिजेत . म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरे गेलो होतो. असे देखील सांबरे म्हणाले .जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली १५ वर्ष शिक्षण , आरोग्य, रोजगार , महिला सक्षमीकरण आणि शेती या मुद्यांवर ठाणे , पालघर , रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात कार्य करत आहे . जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे कोणाकडून कसलीही देणगी न घेता स्व:खर्चाने संस्थेचे सर्व उपक्रम समाजासाठी अगदी मोफत राबवत आहेत . जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांचा फायदा अनेकांना होताना दिसून येत आहे . म्हणूनच जिजाऊ संस्थेचे नाव आज घरा घरात पोहचले आहे. जिजाऊ भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत “वाढदिवस फक्त निमीत्त…उद्देश मात्र सामाजिक दायित्व…” या संकल्पनेखाली मोफत एकूण २३ ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. यात मोफत आरोग्य केंद्र, अभ्यासिका,शिवान क्लास , रिक्षा प्रशिक्षण केंद्र ,मेहंदी क्लासेस ,स्पर्धा परीक्षा केंद्र रक्तदान शिबीर , रुग्णांना फळे वाटप निराधार मुलांसोबत स्नेहभोजन , ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम , ब्युटी पार्लर क्लासेस यांसारखे विविध कार्यक्रम संपन्न झाले. नागरीकांसाठी सुरु करण्यात आलेले आरोग्य केंद्र , विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका , महिलांसाठी विविध लघु उद्योगांचे प्रशिक्षण यांसारखे अनेक उपक्रम संस्था संपूर्ण कोकण विभागातील विविध ठिकाणी गेली १५ वर्ष राबवत आहे . आता कल्याणसह शहाड , आंबिवली आणि टिटवाळा परिसरातही व्यापक स्वरुपात हे उपक्रम राबविण्यात चालू करण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त लाभ येथील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी निलेश सांबरे यांसह मोनिकाताई पानवे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरो रिपोट अनिल गजरे