भिवंडीत बकरी ईद सणाच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेची २ लाख ७५ हजारांची स्लॉटर फी वसुली

भिवंडी

भिवंडी शहरात १७ जून रोजी मुस्लिम धर्मीयांनी बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा केला.दरम्यान बकरी ईद सणाच्या पहिल्या दिवशी महापालिका प्रशासनाने ५ हजार १४८ जनावरांच्या कुर्बानीतून १० लाख २९ हजार २०० रुपये स्लॉटर फी वसूली केली आहे.तर मंगळवारी मनपा प्रशासनाने जनावरांच्या कुर्बानीतून २ लाख ७५ हजार रुपयांची स्लॉटर फी वसूली केली आहे.तर मंगळवारी एकूण १३८६ जनावरांची कुर्बानी देण्यात आली.यामध्ये प्र.स.क्र.१ ते ५ मध्ये बोकड आणि मेंढ्यांची संख्या एकूण ९ आहे.तर म्हैस,रेडा,पाडा यांची संख्या एकूण १३७७ आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाला दोन दिवसांत एकूण १३ लाख ५० हजार ५० रुपयांचे आर्थिक उत्पन्न प्राप्त झाले आहे.दरम्यान १७ जून रोजी मनपाने सोमवारी जनावरांच्या अवशेष,अपशिष्टांच्या घाणीच्या एकूण १८१ गाड्या खाली केल्या आहे.आणि १८ जून रोजी १०३ गाड्या खाली केल्या.त्यानंतर आरोग्य विभागाने नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जंतूनाशक औषध फवारणी केली आहे.तर याप्रसंगी मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी अधिकारी,कर्मचाऱ्यांसह स्लॉटरचा पाहणी दौरा करून बकरी ईद सणात सर्वांनी चोख कामगिरी बजावल्याने सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *