अनधिकृत नळ कनेक्शन बाबत माहिती देण्याचे आवाहन…पालिका आयुक्त अजय वैद्य

भिवंडी

भिवंडी: भिवंडी शहरात बऱ्याच ठिकाणी काही व्यापारी लोकांनी, नागरिकांनी  अनधिकृत नळ जोडण्या करून घेतलेल्या आहेत. या अनधिकृत नळ जोडण्यांमुळे शहरातील पाण्याचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे भिवंडी शहरात अनेक भागात पाणी येत नाही, काही ठिकाणी कमी दाबाने पाणपुरवठा  होणे, तर काही भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. याबाबत महानगरपालिका येथे वारंवार तक्रारी येत आहेत, ही बाब विचारात घेऊन शहरातील अनधिकृत रहिवासी व व्यापारी वापराच्या नळ कनेक्शन वर पालिकेने धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन बाबत  कोणत्याही नागरिकाला जर माहिती द्यावयाची असेल तर ते प्रभारी कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग शेखर चौधरी यांना समक्ष,  भेटून गोपनीय पद्धतीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे तसेच माहिती देणाऱ्या इसमाचे नाव संपूर्णपणे गुप्त राखण्यात येईल. अशी माहिती महापालिकेच्या वतीने आयुक्त अजय वैद्य  यांनी दिली आहे तसेच भिवंडीतील नागरिकांना आवाहन केले आहे की, जिथे कुठे अनधिकृत नळ कनेक्शन  ची माहिती आहे त्याची माहिती देण्यात यावी,
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तसेच पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सहकार्य करावे.
असे आवाहन आयुक्त अजय वैद्य केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *