कोलायटिस म्हणजेच आतांड्यावरील सूज त्याचे प्रकार , लक्षणे आणि होमिओपॅथिक उपचार

लेख

आरोग्य विषयक माहिती.
************************
  **
————————————-
*कोलायटिसचे महत्त्वाचे आणि सर्वसाधारणपणो दिसून येणारे प्रकार पुढीलप्रमाणे..*

> अमिनिक कोलायटिस,

> बॅसिलरी कोलायटिस,

> अल्सरेटिव्ह कोलायटिस,

> इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम. 

*मोठय़ा आतडय़ाचा दाह म्हणजे कोलायटिस.*

असा दाह होण्याची वेगवेगळी कारणो असतात. त्या त्या कारणानुसार रुग्णाला वेगवेगळा त्रस जाणवतो. असा दिसून येणारा त्रस किंवा रुग्णाला जाणविणारी लक्षणो मोठय़ा आतडय़ाच्या कामात बिघाड झाल्याने होतो.

मोठय़ा आतडय़ाची तीन महत्त्वाची कार्ये असतात.

पहिले कार्य म्हणजे पाण्याचे शोषण करणो, दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे मळ साचवून ठेवणो आणि तिसरे कार्य म्हणजे मलविर्सजन करणो.

आपल्या आतडय़ात चोवीस तासांत आठ ते दहा लिटर प्रवाही पदार्थ येत असतात. आपल्याकडून पिण्यात आलेले पाणी इतर पातळ पदार्थ आणि आपल्या तोंडात आतडय़ांमध्ये तयार होणारे विविध पाचक रस असे या पदार्थाचे स्वरूप असते. तोंडातील लाळ, जठरातील अन्नरस, पित्ताशयातून येणारे पित्त, स्वादूपिंडातून येणारा पाचक रस आणि लहान आतडय़ामधून निर्माण होणारे रस यांच्यामुळे हे पाचकरस तयार झालेले असतात. यातील बहुतेक पाणी मोठय़ा आतडय़ात शोषले जाते आणि शंभर ते दीडशे मिलीलिटर पाणी मलविसजर्नात शरीराबाहेर टाकले जाते. *मोठय़ा आतडय़ांच्या आजारामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी झाल्याने मल पातळ राहतो, म्हणजे शौचाला पातळ होते.*



मोठय़ा आतडय़ाला होणा:या दाहामुळे तयार झालेला मल पूर्णपणो साचून ठेवण्याची क्षमती कमी झालेली दिसून येते आणि अशावेळी रुग्णाला वारंवार शौचाला जाण्याची भावना तयार होते.

*आपल्या देशात सर्वाधिक प्रमाणात दिसून येणारा कोलायटिसचा प्रकार म्हणजे अमीबिक कोलायटिस.* एंटाबिका हिस्टॉलिटिका नावाच्या एकपेशीय जंतूमुळे मोठय़ा आतडय़ाच्या अस्तरावर जखमा होतात. त्यातून आंव आणि रक्त पडते. पिण्याच्या पाण्यातील प्रदूषणामुळे आणि दूषित अन्नपदार्थामुळे या आजाराचे प्रमाण सर्वत्र दिसून येते. अमिबिक कोलायटिसकडे दुर्लक्ष केल्याने अथवा अर्धवट सांगोपांगी उपचार केल्याने यकृतामध्ये या जंतूचा प्रसार होतो आणि यकृताला गळूच्या स्वरूपात सूज आलेली दिसून येते.

*बॅसिलरी डिसेन्ट्रीचे* प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. बॅसिलरी डिसेन्ट्रीदेखील जंतूनी दूषित असणा:या पाण्याने आणि खाद्यपदार्थाच्या सेवनाने होते. जिवांणूप्रमाणोच विषाणूच्या म्हणजेच व्हायससेच्या प्रादुर्भावाने देखील कोलायटिस होतो.

*दूषित अन्नपदार्थाचे सेवन, प्रकृतीला न मानवणारं शिळं-पाकं अन्न आणि तब्बेतीच्या तक्रारींकडे डोळेझाक करत उपाचारांसाठी केलेली चालढकल यामुळे कोलायटिससारखा पूर्णपणो बरा होणारा आजार जूनाट स्वरूपाचा आणि थेट तब्बेतीवर आघात करणारा ठरू शकतो.*

स्त्रियांमध्ये कोलायटिसचे प्रमाण कमी असले तरी वेळेवर उपचार न केल्याने आणि उपचार अर्धवट मध्येच सोडल्याने हाच आजार बळावलेला दिसून येतो.

कोलायटिसच्या रुग्णाने खाण्याचे पथ्य आणि औषधांची मात्र कसोशीने पाळणो गरजेचे आहे. अतितिखट मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ आणि दोन जेवणांच्या वेळेमध्ये दिसून येणारी टोकाची तफावत टाळायला हवी. थोडय़ा थोडय़ा वेळाने कमी प्रमाणातील चांगले शिजलेले अन्न तुमची पचनशक्ती तंदुरुस्त ठेवते. त्याचप्रमाणो सर्व प्रकारची हंगामी फळे, शिरांच्या भाज्या, कोशिंबिरीमुळे अन्न पचनाच्या ताकतीमध्ये नक्कीच वाढ होते.

विषाणू अथवा जिवाणू संसर्गाच्या कोलायटिसमध्ये अधमुरे दही, गोड ताक, शहाळ्याचे पाणी, वरणाचे पाणी, मोड आलेल्या भाज्यांचे कढण, आलं-लिंबू पाणी, आमसुलाचे सार यांचे सेवन फायदेशीर ठरते.

विविध डाळी, उसळींचे सेवन आपल्या प्रकृतीला विचारात घेऊन करावे.

*अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये रुग्णाची तब्बेत झपाटय़ाने खालावते. दूध किंवा दूधापासून तयार झालेल्या कोणत्याही पदार्थाच्या सेवनाने शौच्यास पातळ होऊन आंव आणि रक्त पडू लागते.*

*कोलायटिसची लक्षणे*

 आतडय़ाच्या शेवटच्या भागाचे म्हणजे सिग्मॉईड कोलन रेक्टम आणि एनल कनाल यांचे काम मल विसजर्नाचे असते. मोठय़ा आतडय़ाच्या कार्यात झालेल्या बिघाडामुळे मल पूर्णपणो पुढे सरकत नाही. मल पूर्णपणो बाहेर न पडल्याने थोडय़ा थोडय़ा प्रमाणात मलविसजर्न होत राहते. आणि असा मल व्यवस्थित बांधलेला देखील नसतो. म्हणजेच मल पातळ असणो. शौच्याला वारंवार जावे लागणो आणि पुन्हा पुन्हा शौच्याला जाऊन देखील शौच्यास साफ झाली नाही अशी भावना निर्माण होणो ही कोलायटिसची तीन प्रमुख लक्षणो आहेत. 

*मोठय़ा आतडय़ातून मल सहजपणो पुढे सरकत जावा यासाठी वंगणासारखा एक बुळबुळीत पदार्थ तयार होत असतो. यालाच आंव असे म्हणतात.* आतडय़ाच्या दाहामुळे ही आंव मोठय़ा प्रमाणात तयार होऊन, शौच्यावाटे बाहेर पडते, यालाच आंव पडणो असे म्हणतात. 

आतडय़ाच्या अस्तरामध्ये जास्त प्रमाणात दाह झाला तर जखमा होतात आणि त्यातून रक्त पडलेले दिसून येते. मोठय़ा आतडय़ाला दाह झाल्याने त्या आतडय़ांच्या स्नायूंचे काम चेतावले गेल्यामुळे त्याचे आकुंचन प्रमाणापेक्षा जास्त होते आणि अशा वेळेस रुग्णाच्या पोटात कळ येते. कळ येऊन शौच्यास होणो हे देखील कोलायटिसचे एक लक्षण होय.*होमिओपॅथिक उपचार*

अंतर्बाह्य, स्वच्छता, अन्नपदार्थाच्या माध्यमातून आपल्या पोटात काय जाऊ शकतं याबद्दल जागरुकता, योग्य पौष्टिक आहार, शारीरिक व्यायाम, मन:स्वास्थामुळे आपण कित्येक आजार टाळू शकतो आणि त्याचबरोबर आजार झालाच तर वेळीच पूर्ण होमिओपॅथिक उपचारांमुळे समूळ नष्ट होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *