भिवंडी वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीने गुरुवारी २३ मे रोजी ग्राहकांसाठी शहरातील आम पाड्यातील अर्श ग्राहक सेवा केंद्र येथे संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या संवाद कार्यक्रमात ३०० हून अधिक ग्राहक सहभागी झाले होते.या कार्यक्रमात टोरेंट अधिकार्यांनी ग्राहकांच्या समस्ये निराकरणासह एप्रिल महिन्यापासून लागू नवीन वीज दर, पीडी ग्राहकांच्या महावितरणच्या थकबाकीसाठी विशेष व्याज माफी योजना “डीएफ स्पेशल ऍम्नेस्टी स्कीम २०२३”, प्रलंबित विज जोडण्या, विजिलेंस, बिला संबंधित आणि डिजिटल पेमेंट सेवा यासारख्या मुद्द्यांवर ग्राहकांना माहिती देण्यासाठी जागरूकता निर्माण मोहीम म्हणून देखील या प्रसंगाचा वापर केला.या संवाद कार्यक्रमात टोरेंट पॉवरचे महाव्यवस्थापक – अरुण राव, अंकित साहा, बिनु सेतुमाधवन, राघवेंद्र राव, विजय राणे, जनसंपर्क अधिकारी – सुधीर देशमुख, चेतन बदियानी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.अनेक ग्रामीण आणि शहरी ग्राहकांनी या संवाद कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देवून उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.तर यापूर्वी टोरेंट पॉवरने भिवंडी शहरात अनेक संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.आणि या संवाद कार्यक्रमात २५०० हून अधिक ग्राहकानी सहभागी दर्शवला आहे.
