भिवंडी गांवकरी TODAY NEWS
मौज मजेकरिता घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्या त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.तर त्यांच्या दोन फरार साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.आसीफ सत्तार शेख (२५ रा. भिवंडी),सुफिया अमान खान (२१),तस्लीम अमान खान (२९ दोघे रा.मानपाडा,कल्याण) अशी अटक केलेल्या त्रिकुटाची नावे आहेत.त्यांच्याकडून घरफोडीच्या २ गुन्ह्यांच्या उकळीत एकूण ४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,नारपोली पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्याने गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुन्हे आढावा बैठकीत दिले होते.त्यानुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीराज माळी, पोह प्रकाश पाटील, देवानंद पाटील, शशीकांत यादव, वामन भोईर, अमोल देसाई, मपोह श्रेया खताळ, माया डोंगरे, पोना सचिन जाधव, पोशि उमेश ठाकुर, अमोल इंगळे, भावेश घरत, सचिन सोनावणे, चापोशि रविंद्र साळुंके आदी पोलिस पथक तयार करण्यात आले होते.दरम्यान पोशि उमेश ठाकूर यांना गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरील त्रिकुटाला ६ मे रोजी सापळा रचून अटक करण्यात आली आहे.आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून नारपोली व मानपाडा पोलिस ठाण्यातील घरफोडी चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणून ॲक्टिव्हा मोटारसायकल व ऑटो रिक्षा अशा २ वाहनांसह एकूण ४ लाख ९१ हजार ८००रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.यासह पोलिसांची कुणकुण लागताच फरार झालेल्या त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे.
