आरोग्य विषयक माहिती,बद्धकोष्ठता

लेख



बध्दकोष्ठ, Constipation,कब्ज
बध्दकोष्ठ म्हणजे रोज शौचाला न होणं, शौचाला अतिशय कडक होणं, शौचाला होण्यासाठी कुंथायला लागणं, शौचाला जाऊन आल्यावरसुद्धा भावना तशीच राहणं म्हणजे शौचाला साफ झाली नाही ही भावना राहणं.दिवसातून एकदा नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.
बध्दकोष्ठ ही समस्या मलविसर्जनाच्या सवयीतील बदल दर्शवते, ज्यामधे, मलाचे प्रमाण कमी होते, मल घट्ट होतो, मलविसर्जनाची वारंवारता कमी होते, किंवा मल विसर्जन करताना खूप कुंथावं लागतं.  मल विसर्जनाची सामान्य वारंवारता आणि त्यातील सातत्य हे व्यक्तीनुसार वेगवेगळं असतं (दर आठवड्याला तीन ते बारावेळा शौचास जाणे हे बहुधा सामान्य असते).अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. भारतातील जवळ-जवळ १५-२०% व्यक्तींना बऱ्याच काळ बद्धकोष्ठ आहे.

*बध्दकोष्ठ कारणं*

१)जंक फूड, दारू, अति खाणं, धुम्रपान इत्यादी मुळे याचं प्रमाण वाढलं आहे.

२)फायबरयुक्त,चोथायुक्त आहाराची कमतरता
डीहायड्रेशन
शारीरिक हालचाल कमी होणे.व्यायामाचा अभाव- सर्व भौतिक सुख सोयींमुळे सध्या शारीरिक हालचाली फारच कमी प्रमाणात होतात. त्यामुळे त्याला रोज नियमित व्यायामाची जोड देणं आवश्यक आहे. शरीरास व्यायाम नसल्याने पोटातील पचलेलं/न पचलेलं अन्न पुढे सरकायला खूपच वेळ लागतो व बध्दकोष्ठ संभवतो.

३)ताण तणाव- सध्याच्या सुपरफास्ट लाइफस्टाइलमुळे निर्माण होणाऱ्या ताणामुळे शरीरात संप्रेरकं (harmones) स्रवली जातात, ज्यांचा परिणाम आतड्यांच्या कार्यावर होऊन त्या मंदावतात. त्यामुळे पोटात गच्च वाटणं, ढेकर येणं, पोटात गॅसमुळे गुरगुर आवाज येणं, इ. तक्रारी सुरु होतात.

४)गरोदरपण- यामध्ये पोटातील जागा ही वाढत्या बाळाने व गर्भाशयाने व्यापली गेलेली असल्याने आतड्याच्या कामात थोडा अडथळा उत्पन्न होतो व वरील सर्व गोष्टींमुळे बध्दकोष्ठाचा त्रास सुरु होतो.

५)सौच मार्गात अडथळा गुदद्वाराच्या जागी असलेले मोड किंवा फिशर्स किंवा पाइल्स- यामुळे शौच करताना दुखतं वा रक्तस्राव होतो व त्यामुळे शौच थांबवली जाते व बध्दकोष्ठता होते.

६)ठराविक औषधे घेणे.
अॅसिडीटीसाठी घेण्यात येणारी औषधं, हार्टच्या, रक्तदाबाच्या तक्रारीसाठी घेण्यात येणारी काही औषधं, मधुमेहाची औषधं, कॅल्शिअम कार्बोनेटच्या गोळ्या, रक्तवाढीसाठी देण्यात येणारी काही टॉनिक यामुळे बध्दकोष्ठाचा त्रास होतो.तसेच मानसिक विकारांवरील औषधं, फिट्स विरोधी औषधं, कॅल्शिअम, वेदनाशामक औषधं, लोहयुक्त औषधं, लोहयुक्त गोळ्या, सूज कमी करणाऱ्या, शरीरातील पाणी कमी करणाऱ्या गोळ्या यामुळे मलावष्टंभ होतं.

७)आतड्यात विकृती येते अथवा वयोमानाप्रमाणे किंवा मज्जू संस्थेच्या आजारामुळे आतड्याची हालचाल कमी होते व शौच पुढे सरकत नाही.

८)जठराग्नी उत्तम नसल्याने, पाचक अग्नी अधिक असताना योग्य आहार न मिळणं,

९)थायरॉइडच्या कमी स्त्रावाच्या अवस्थेत (Hypothyroidsm), मधुमेह कॅल्शिअम अधिक असणं आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ अधिक खाणं, पोटाचे सर्वच विकार,

१०)वजन कमी असणं आणि जास्त असण्याने मलावष्टंभचा त्रास होतो.

११)मधुमेह,कंपवात ,मेंदूशी संबंधित वेगवेगळे आजार या सारख्या आजारामुळे ही बध्दकोष्ठ अथवा मलावष्टंभ होतो.

*बध्दकोष्ठाचे प्रकार*

१)एक्यूट कॉन्सटीपेशन आठवडा दोन आठवड राहणाऱ्या बध्दकोष्ठाला म्हणतात.

२)क्रॉनिक कॉन्सटीपेशन
दोन आठवड्या पेक्षा अधिक त्रास असणाऱ्या ला म्हणतात.

*वारंवार बध्दकोष्ठ झाल्यास काय त्रास होतो.*

१)टाँयलेट करताना दखणे.

२)पोटात गँस रहतो.पादल्यास वास येतो.

३)करपट ढेकरा, पादल्यास अंतरवस्त्रांवर तेलकट स्त्राव बाहेर पडतो.

४)कंबर ते पाय हा भाग प्रचंड दुखतो.

५)खूप थकवा.

६)अती बसल्याने पायाला मुंग्या येण्याचा त्रास होतो.

७)प्रंचड अथवा नाँर्मल पोटदुखी चा त्रास सुरू होतो.

८)डोकेदुखी, अर्धशिशी हे त्रास सुरू होतात.

९)पोट कायम जड,भारी होतं,बेचैनी वाढते,फ्रेश वाटत नाही,सारखे गँसेस होतात, जेवणानंतर पोट फुगते.

१०)त्वचेवर परिणाम होऊन अनेक त्वचारोग बळावतात उदा.गजकर्ण, नायडा,खाज,खरूज,गांधी, शितपित्त,पुरळ,पिंपल्स, त्वचेवर डाग,अनेक चट्टे, वगैरे.दिर्घकाळ बध्दकोष्ठ असल्यास अनेक अजार फ्री आँफ काँस्ट मिळतात.

११)अंग बाहेर येणे,पाईल्स, फिशर, पिस्टूला.

*बध्दकोष्ठाचा त्रास होऊ नये वाटत असेल तर हे करा.*

१)रात्रीच्या जेवणात मैदा, जंकफूडचा समावेश करणं टाळा. यामध्ये फायबर घटक नसल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

२)रात्री दारूचे सेवन, सिगारेट प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

३)आयर्न, कॅल्शियम सप्लिमेंट यांचे रात्री सेवन करणं टाळा. 

४)रात्रीच्या वेळेस डेअरी प्रोडक्ट्स टाळा. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक गंभीर होतो.

५)रात्रीच्या वेळेस चहा, कॉफी पिणं टाळा.

६) फरसाण, चणे, चुरमुरे, फुटाणे,शेव,गाठी,चकली नियमितपणे खालल्यास बध्दकोष्ठ होते.

७)नियमित साँफ्ट ड्रिंक पिणार्या ला होऊ शकते.

८)मल प्रवृत्तीचा वेग आला असताना दाबून ठेवणं (लहान मुल आणि तरुणांमध्ये हे कारण अधिकतम दिसतं) बसून न खाणं, खाऊन चलन वलन न करता लगेचच बसणं, मानसिक कारणांमध्ये उत्तेजितता, नैराश्य, मनाविरुध्द घडणं, भीती, अति आनंद, अति रडणं, अति हसणं ही कारणं प्रामुख्याने असतात.

९) तेलकट आणि साखर जास्त असलेले पॅकेट चे खाद्य पदार्थ टाळावे.

*उपाययोजना*

१)थंडपाणी, थंड पेय,थंड जेवण घेऊ नका नेहमी गरमपाणी प्या.व्यवस्थित शिजलेल्या सर्व भाज्या खा.

२)पिकलेली केळी पोटसाफ होण्यासाठी उत्तम असतात, सफरचंद तसेच त्या पासून बनवलेला शिरका ही छान पोटसाफ करतो.वेगवेगळी फळ ही पोटसाफ करतात. फक्त ही फळे शिकरण,अथवा फ्रुटसँलेड या प्रकारात बिलकुल खाऊ नयेत.तर ती दोन जेवणांच्या मध्यंतरी म्हणजे संध्याकाळी खावीत.

३)रोज झोपण्यापूर्वी  व सकाळी उठल्यावर कपभर गरम दूधात एक चमचा तूप घालून प्या.

४)झोपण्यापूर्वी गरमपाण्यात चमचाभर आळशीचे चुर्ण टाकून पीत जा.

५)आल्याचा कपभर काढा करून त्यात एरंडेल तेल चमचाभर घालून प्या.

६)सकाळी अर्धा लिंबू रस व दोन चिमूटभर काळे मीठ घालून घेत जा.

७)रात्री दोन चमचे मध व कपभर पाणी घालून रोज घेत जा.

८)चारपाच काजू व आठदहा मनुका एकत्र करून रात्री झोपताना व सकाळी  खात जा.

९)रात्री झोपताना गरम दूधात चमचाभर एरंडेल तेल घालून प्या.

१०)चमचाभर इसबगोल गरम दूधात, गरमपाण्यात रात्री घेत जा.

११)पेरू व पपईचा ज्यूस रात्री झोपताना घेतल्यास पोटसाफ होते.

१२)पालकाचा रस पावकप रोज सकाळी संध्याकाळी घेणे.

१३)रात्रीच्या जेवणात जड अन्न मासांहार, गोड पदार्थ,इस्टवाले पदार्थ पाव, बर्गर, पिझ्झा,आईस्क्रीम खाणार्याला शंभर टक्के बध्दकोष्ठ होते व पुढे यातून  बीपी व शुगर व थायराँईड,त्वचा विकारांचा चा त्रास होतोच तेव्हा हे पदार्थ टाळावे.हलका आहार घ्यावा.

१४) रोज पेरुची दहा पाने,सिताफळाची दहा पाने चाऊन खालल्यास बध्दकोष्ठ व मधुमेह नियंत्रणात येऊन पोटसाफ होते.

१५) जेष्ठमध आलेरस समप्रमाणात घेतल्यास ही पोटसाफ होते रोज रात्री व सकाळी उठल्यावर.

१६)काळीमिरी पावडर, सोप,ओवा ,तुळशीचा रस,व आलेरस व गुळ एकत्रित करुन रोज घ्या दोन्ही जेवणानंतर.

१७) मेथीचे दाणे भाजून ते पावडर करा.पित्ताचा त्रास नसणाऱ्या मंडळींनी रोज रात्री गरमपाण्यात घ्या.

१८)जीरे,ओवा ,आळशीचे बी तव्यावर भाजून पावडर करा.रोज रात्री गरमपाण्यात घ्या.

१९)रोज रात्री झोपताना मुठभर चणे व गूळ खा सोबत दोन लसूण पाकळ्या तूपात परतून खात जा.

२०)बेलाच्या पानांचा रस अथवा रोज झोपताना बेल मुरंबा खात जा.

२१)अंजीर सुके दोन गरमपाण्यात उकळून खा व पाणी प्या रात्री.

२२)उंबराचे फळ पिकलेले आतला भाग साफ करून खात जा. यात आत पाखरे असतात.

२३)बध्दकोष्ठाचा त्रास असणाऱ्या मंडळी नी रोज.अधोमुख शवासनः,मत्स्येंद्र आसन:,पवनमुक्तासन:अनजनेयासन:बालासन:उत्तनासन:सुप्त मत्स्येन्द्रासन ही योगासने योग टिचर च्या निरिक्षणात करा.

२४)सोप,सुंठ,पादेलोण,छोटी,फ्लँक्स सिडस, हरड,ओवा,जीरे, काळीमिरी एकत्र चुर्ण करून रोज रात्री एक चमचा घेतल्यास जुन्यातील जुना बध्दकोष्ठ दुर होतो.सर्व समभाग करुन चुर्ण करावे.

२५)नारळ पाणी देखील पोट साफ करण्यासाठी रामबाण उपाय आहे. रोज नारळपाणी सकाळी रिकाम्या पोटी पिण्यामुळे पोट स्वच्छ होते.

२६)बध्दकोष्ठासाठी पोटातून उपाय करायचा असल्यास 15 ते 40 मि.ली. शेंगदाणा तेल  रात्री प्यायला द्यावे. त्यापाठोपाठ गरम पाणी किंवा चहा द्यावा म्हणजे जिभेवर तेलकट चव राहणार नाही. या उपायानेही खडे सुटतात.

२७)मळाचे कोरडे खडे झाले असल्यास ते बाहेर पडण्यासाठी तोंडातून औषध देण्यापेक्षा गुदद्वारामार्फत उपाय करणे चांगले. यासाठी जुन्या मऊ सुती कापडाची सुरळी (करंगळीइतकी जाड) करून एरंडेल तेलात भिजवून गुदद्वारातून आत सरकवावी. रुग्णास स्वत:सही ही क्रिया जमू शकेल. यानंतर तीन-चार तास पडून राहण्यास सांगावे (किंवा हा उपाय झोपताना करण्यास सांगावे). यामुळे कोरडे खडे तेलकट होऊन बाहेर पडणे शक्य होते. लहान मुलांसाठी आणि वृध्दांसाठी हा उपाय फार चांगला ठरतो. याऐवजी तेलाची पिचकारीही चालेल.

२८)एक-दोन चमचे तेलकट किंवा बुळबुळीत पदार्थ (उदा. गोडेतेल) गुदद्वारात भरल्यास आतले  मळाचे खडे 10-15मिनिटांत बाहेर पडतात व दुखत नाही.

२९)सकाळी पोट साफ झाले नसेल अशा वेळी लंघन करणे हे उत्तम .

३०)रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर गुलकंद वर गरमपाणी घेत जा.

३१)चमचाभर मेथीचे दाणे काळ्या मीठा सोबत खा.

३२)मोड आलेले कडधान्य मुठभर रोज कच्चे खालल्यास बध्दकोष्ठाचा त्रास कमी होतो.

३३)पुदीनाची पंधरा पाने कपभर पाण्यात उकळून काढा प्या.
वरील विवेचना वरुनआपणास आता ह्या आजारा बदल पुर्ण माहिती झाली असेल अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *