लिव्हरवर सूज आणतात या 2 चुकीच्या सवयी, सोडल्या नाही तर कधीच पचणार नाही अन्न आणि त्यावर घरगुती उपाचार आणि होमिओपॅथी उपचार

लेख

*आरोग्य विषयक माहिती.*
************************
  *
————————————-
डॉ संतोष साळुंखे  9960421979

Fatty Liver* : फॅटी लिव्हर ही एक गंभीर समस्या आहे. ज्याला मेडिकल भाषेत हेपेटिक स्टीटोसिस (Hepatic Steatosis) असं म्हटलं जातं. या आजारामुळे लिव्हरच्या कोशिकांममध्ये फॅट जमा होतं. ज्यामुळे लिव्हरवर सूज येतो. गेल्या काही वर्षात फॅटी लिव्हरच्या समस्या खूप वाढल्या आहेत. लिव्हरमध्ये काही प्रमाणात फॅट असतंच पण जेव्हा ते लिव्हरच्या वजनापेक्षा 5 ते 10 टक्क्यांपर्यंत पोहोचतं तेव्हा ही समस्या होते.
जास्तीत जास्त केसेसमध्ये फॅटी लिव्हर रोग कोणतीही गंभीर समस्या निर्माण करत नाही. पण याने लिव्हरचं काम प्रभावित होतं. यामुळे लिव्हरवर सूज येते, यामुळे त्याचे टिश्यू डॅमेज होतात. फॅटी लिव्हर हा आजार दोन प्रकारचा असतो एका आहे अल्कोहल-फॅटी लिव्हर डिजीज जी मद्यसेवन अधिक केल्याने होते आणि दुसरा प्रकार आहे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज. ही समस्या लठ्ठपणा किंवा डायबिटीस या कारणांमुळे होते. चला जाणून घेऊ मद्यसेवनाशिवाय ही समस्या कोणत्या कारणांनी वाढते

*अनहेल्दी डाएट*

NCBI वर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, अनहेल्दी फॅट, शुगर आणि प्रोसेस्ड फूडचं अधिक सेवन केल्याने तुम्हाला हा आजार होऊ शकतो. जास्त कॅलरींचं सेवन आणि आवश्यक पोषक तत्वांची कमतरता यामुळे लिव्हरच्या पचनाच्या क्षमतेवर वाईट प्रभाव पडतो. ज्यामुळे लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅट जमा होतं.

*इन्सुलिन रेसिस्टेंट आणि* *डायबिटीस*

इन्सुलिन रेसिस्टेंट एक अशी स्थिती आहे ज्यात शरीराच्या कोशिका इन्सलिनबाबत कमी प्रतिक्रिया देतात. इन्सुलिन एक हार्मोन आहे जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतं. याने लठ्ठपणा वाढण्याचा आणि टाइप 2 डायबिटीस होण्याचा धोका असतो.

*मद्याचं अधिक सेवन*

क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, मद्याचं अधिक सेवन फॅटी लिव्हरचं एक मोठं कारण असतं. याने अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. इतकंच काय तर मद्यसेवन कमी केलं तर लिव्हरला समस्या होऊ शकते.

*मेटाबॉलिक सिंड्रोम*

मेटाबॉलिक सिंड्रोम अनेक आजारांचा एक ग्रुप आहे ज्यात लठ्ठपणा, हाय बीपी, हाय ब्लड शुगर आणि अबनॉर्मल लिपिड प्रोफाइल यांचा समावेश आहे. याने रूग्णाच्या लिव्हरच्या कामावर परिणाम होतो.

*आपल्याकडे फॅटी लिव्हर साठी होमिओपॅथी औषध मिळतील 100% रिझल्ट अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा खालील क्रमांकावर  कॉल करा*

  *संपर्क आरोग्य विषयक माहिती*
*डॉ संतोष साळुंखे दांडेगावकर होमिओपॅथी तज्ञ 9960421979*

  *कावीळ झाल्यावर सपोर्टी ट्रीटमेंट म्हणून खालील घरगुती उपाय अवश्य करावेत*

कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा देखील ठरू शकतो. कावीळचे विविध प्रकार आहेत पण आम्ही येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळ वर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत.
हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न वरचेवर खाल्ल्यामुळे होतो. या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमी होते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे रुग्णाचे पूर्ण शरीर पिवळे दिसायला लागते. या रोगा मध्ये रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि लघवी पण पिवळी होते. या आजारात रक्तामध्ये दुषित द्रव मिक्स होऊन अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होऊ शकतात.
यामध्ये लिवर सुजणे आणि भूक कमी लागणे या समस्या होतात.

कावीळ म्हणजे ज्याला हिंदी मध्ये पिलिया म्हणतात हा आजार लीवर (यकृत) च्या संबंधातील आजार आहे. कावीळ एक साधारण आजार वाटतो पण जर याचे वेळीस उपचार केले गेले नाही तर हे भयंकर रूप धारण करू शकते यामध्ये रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या जीवघेण्या आजारासाठी घरगुती उपाय सांगत आहोत. जे तुमच्या काविळीला बरी करण्यास उत्तमा ठरेल. हा उपचार कावीळ मग तो हेपेटाइटिस A, B, किंवा C किंवा मंग बिलरुबिन, ESR वाढलेले असेल तरीही फायदेशीर राहील.

काविळी पासून सुटका मिळवण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय

*शहाळे (हिरवे नारळ) :*
रोज दिवसातून कमीतकमी 2 शहाळेचे पाणी प्यावे, या नारळाचे ताजे पाणी प्यायचे आहे म्हणजे ते फोडल्यावर लगेच त्याचे पाणी प्यायचे आहे. असे 3-5 दिवस केल्यानंतर तुम्हाला निरोगी झाल्याचा अनुभव येईल. संपूर्ण दिवस त्याला फक्त नारळ पाणी वरच ठेवा. हा उपाय अनेक रुग्णांना फायदेशीर ठरला आहे. लिवर मध्ये होणाऱ्या कोणत्याही आजारासाठी हा प्रयोग निसंकोच केला जाऊ शकतो.

*कांदे :*
कावीळच्या इलाजामध्ये कांद्याला विशेष महत्व आहे. सर्वात पहिले एक कांदा सोलून त्याचे पातळ-पातळ तुकडे करून यामध्ये लिंबू पिळणे त्यानंतर यामध्ये थोडी काळीमिरी पावडर आणि काळे मीठ मिक्स करून दररोज सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यामुळे कावीळ लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते.

चण्याची डाळ :
रात्री झोपण्या अगोदर चण्याच्या डाळीला भिजत ठेवा. पहाटे उठून भिजलेल्या डाळीचे पाणी काढून त्यामध्ये थोडेसे गुळ मिक्स करा. हा उपाय दररोज एक ते दोन आठवडे केल्यामुळे कावीळ बरी होण्यास मदत होते.

*सुंठ :*
सुंठ चा वापर करून देखील कावीळचा उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यासाठी सुंठ 10 ग्राम, गुळ 10 ग्राम घ्यावा. ही सामग्री एकत्र करून सकाळी थंड पाण्यासोबत खाण्यामुळे कावीळी पासून सुटका होण्यास मदत होते.

*लसून :*
कावीळी मध्ये लसून देखील फायदेशीर आहे. यासाठी कमीतकमी 4 लसून कुड्या घ्याव्यात आणि त्यांना सोलून त्यांना बारीक वाटावे त्यामध्ये 200 ग्राम दुध टाकावे. आणि रुग्णाने रोज हे खाण्यामुळे कावीळ मुळा सकट संपून जाण्यास मदत होते.

चिंच :
चिंच रात्री झोपण्या अगोदर पाण्यात भिजत ठेवावी सकाळी चिंच व्यवस्थित पाण्यात पिळून काढावी आणि या पाण्यात थोडी काळीमिरी पावडर आणि थोडे काळेमीठ मिक्स करून प्यावे. दोन आठवडे हे पिण्यामुळे कावीळ ठीक होण्यास मदत होते.

मध आणि आवळा रस :
एक चमचा मध घ्यावे त्यामध्ये 50 ग्राम ताज्या हिरव्या आवळ्याचा रस मिक्स करून दररोज सकाळी कमीतकमी तीन आठवडे खाण्यामुळे कावीळ पासून सुटका मिळण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *