बनावट कागदपत्रांद्वारे विकासकाची फसवणूक ; महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

भिवंडी



भिवंडी एका महिलेने बांधकाम विकासकाने विकसीत केलेल्या २ इमारतींपैकी एका इमारतीचे क्रमांक व विकासकाने विक्री केलेल्या सदनिका अन्य साथीदारांच्या मदतीने बनावट कागद पत्रांद्वारे स्वतःच्या नावावर करून विकासकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी महिलेसह तिच्या अन्य साथीदारांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील मौजे नागाव -२ येथील सर्व्हे नं.७७/५ भूखंड ४,५,६ ही जमीन मूळ मालक सादिक मेहमूद अन्सारी व अन्य काही जणांकडून फिर्यादी विकासक आसिफ मंजूर शेख यांनी ३ मार्च २०२१ ते २३ मार्च २०२१ पर्यंत विकसित करण्यासाठी घेतल्या होत्या.दरम्यान त्यांनी विकसित केलेल्या इमारत क्र.१७६४ या इमारतीचा क्र.नजमाबानोने भिवंडी महापालिकेत बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने क्र.३३०७ नागाव -२ असा करून विकासक आसिफच्या नावे असलेल्या व त्याने विक्री केलेल्या सदनिका स्वतःच्या व तिच्या साथीदारांच्या नावे करून आसिफसह सदनिका धारकांचीही फसवणूक केली आहे.त्यामुळे ३१ जानेवारी रोजी आसिफच्या फिर्यादीवरून नजमाबानो आणि तिच्या साथीदारांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात ४२०,४६५ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोनि (गुन्हे) विक्रम मोहिते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *