आरोग्य विषयक माहिती.
डॉ.संतोष साळुंखे दांडेगावकर होमिओपॅथी तज्ञ M.D.भेळ चौक निगडी पुणे.गवळी मारोती मंदिर वरचा मजला वसमत
———————————-
किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो.
किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो.
*मुतखडा निर्माण होण्याची कारणे*
*पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.
*मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे नाइडस तयार होतात. व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते.
*अनुवंशिकतेमुळे
*ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक अॅसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.
*गर्भारपणात प्रोजेस्टेरॉनचा स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात.
*गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मुतखडे होण्याचे प्रमाण वाढते व खडे तयार होतात.
*लघवीतील न विरघळणारे स्फटिकजन्य पदार्थ एकत्रित जमा झाल्याने.
*लघवीचे प्रमाण कमी झाल्याने.
*लघवीतील मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
*हायपरपॅराथाईरॉयडीसम असणाऱ्या ना ही मुतखडा होऊ शकतो.
*पचनसंस्थेचे विकार असल्यास.
*व्हीटँमीन सी किंवा कँल्शीयम असलेल्या औषधांचे अधिक सेवन.
*दीर्घकाळ अंथरूणावर पडून असलेले रुग्ण.
*लक्षणे*
# किडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, #. पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या कापल्यागत तीव्र वेदना असणे,
#. मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे. # प्राथमिक अवस्थेत पोटात खूप त्रास व लघवीमध्ये रक्त तसेच जेलीयुक्त घटक पडतात. गंभीर अवस्थेत गडद रंगाची, गढूळ व मंदप्रवाही लघवी असते.
*तपासणी*
एखाद्या आजाराचे निदान कळण्यासाठी तपासण्या गरजेच्या असतात. मूत्रातील जंतुसंसर्ग बघण्यासाठी लघवीची तपासणी केली जाते. किडनी स्टोनचा आकार, स्थान तसेच किडनीच्या रचनेतील बदल पाहाण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी करणे महत्त्वाचे आहे. तसेच गरजेनुसार एक्सरे, सिटीस्कॅन, रिनल बायॉप्सी इत्यादी
*मुतखडा आणि होमिओपॅथिक उपचार*
होमिओपॅथीत किडनीस्टोन या आजारावर प्रतिबंधात्मक व प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. कोणतेही तज्ज्ञ व होमिओपॅथ आपल्याकडे आलेल्या रूग्णाचं व्यक्तित्व व आजाराची लक्षणे खोलात जाणून घेतल्याशिवाय उपचार करत नाही. सर्वासाठी एकच औषध, असे होमिओपॅथीमध्ये नसते.
आजार किंवा विकार मुळातून बरे करायचे असतील तर वेगवेगळया व्यक्तींना त्यांच्या सवयी, आहार, स्वभाव त्यानुसार वेगळेच उपचार करावे लागतात. शरीरांतर्गंत असणारी वेगवेगळी जैव रसायने आणि त्याच्या रूग्णाच्या शरीर मन स्वास्थावर परिणाम हे दोन्ही सांभाळले जाते. प्रतिबंधात्मक व प्रभावी किडनी स्टोनवरील होमिआेपॅथिक औषधोपचार अनेक रुग्णांना फायदेशीर ठरत आहेत.
*आजारावर मात करण्यासाठी, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी, तो पुन्हा न होऊ देण्यासाठी, त्यातून पुढे गुंतागुंत निर्माण न होऊ देण्यासाठी योग्यवेळी योग्य ते निदान व होमिओपॅथिक औषधोपचार अतिशय महत्त्वाचे असतात. होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे गरजेचे आहे .*
शारीरिक, मानसिकता, आहारातील आवड-निवड, झोप, स्वप्न, आनुवंशिक आजार, प्रकृती थंड/उष्ण इ. सर्वांचा होमिओपॅथिक शास्त्रानुसार सूक्ष्म अभ्यास करून रुग्णाच्या प्रकृतीला साम्य असे असणारे औषध निवडले जाते आणि जेव्हा या होमिओपॅथिक शास्त्रानुसार औषध चालू होते तेव्हा रुग्णांची लक्षणे कमी होतातच, शिवाय सोनोग्राफी रिपोर्टमध्ये खडा लहान झाल्याचे किंवा खडा पूर्णपणे निघून गेल्याचेही समजते. म्हणून होमिओपॅथिक प्रकृतींचे औषध पुढे काही दिवस घेणे जरूरी आहे. शिवाय आहारातील पथ्य, योगासने ही काळजी रुग्णांनी घेणे जरूरी आहे. भरपूर प्रमाणात पाणी पिणे, क्षारयुक्त, विहिरीचे व बोअरचे पाणी पिऊ नये. टोमॅटो, कोबी, कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. वेळोवेळी लघवीला जावे, लक्षणांची जाणीव होताच सुरुवातीलाच डॉक्टरांनी भेटून सल्ला द्यावा व नियमित औषधोपचार करून घ्यावेत. जर रुग्णांनी वरील गोष्टी आत्मसात केल्या व होमिओपॅथीचे प्रकृतीचे औषध व्यवस्थित घेतले तर रुग्ण मूतखड्याच्या तक्रारीतून व नेहमी होणार्या मूतखड्याच्या चक्रातून सहीसलामत नक्कीच सुटेल.
