डॉ.रमीता राठोड 9167938743
तुळशीचे झाड प्रत्येकाच्या घरी असते. मात्र, या झाडाचे आर्श्चकारक फायदे आहेत. तुळशीचे पान खाल्याने वजन कमी होतं असे म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. यामुळे तुमच्या शरीरातील चरबीही कमी होऊ शकते. तुळशी आणि तुळशीची पाने बऱ्याच वर्षांपासून आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरले जात आहेत. सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
तुळशीच्या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्याला बऱ्याच रोगांपासून वाचवू शकतात. याने शरीराची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. त्यामुळे आपणास कोणत्याही विषाणूची लागण त्वरित होऊ शकत नाही. रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी तुळशीचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. एवढेच नाही तर तुळशीच्या पानांनी आपले वजनही कमी करता येते. हे आरोग्यासाठी खूप चांगले असते. सर्दी, खोकला, घसा खवखवल्यावर तुळशीच्या पानांपासून तयार केलेला काढा पिल्याने शारीरिक समस्या दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आणि त्यापासून बनविलेला चहा पिल्याने दीर्घ निरोगी आयुष्य लाभते. तुळशी पासून बनवलेल्या चहात अजिबात कॅलरी नसतात, म्हणून त्याचे सेवन केल्यास वजन वाढत नाही. जर आपण जिम मध्ये जाऊन वजन कमी करत असाल, आपले शरीर तंदुरुस्त बनवीत असाल तर अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी जिम मध्ये जाण्यापूर्वी तुळशीचा चहा प्यावा. यामुळे तग धरण्याची क्षमता वाढेल आणि अधिक मेहनत घेत त्वरित चरबी बर्न करण्यास सक्षम व्हाल.
*पचन शक्ती सुधारते*
पचन शक्ती चांगली राहिल्यास वजन कमी करण्यास मदत होते, यासाठी तुळशीचा चहा प्यावा. सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात चांगले बॅक्टेरिया विकसित होतात. आतड्याची हालचाल चांगली होते, ज्यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेस वेग येतो.
*यकृत निरोगी राहते*
तुळशीचा चहा पिण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर येते. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. यकृत पचन प्रक्रियेस मदत करतो आणि शरीरास आतून स्वच्छ करतो. यकृत शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतो आणि शरीरातील चरबी कमी करतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दररोज तुळशीची पाने किंवा त्यापासून बनवलेला चहा घ्यावा.
*वजन होते कमी*
जर आपणास वजन कमी करायचे असेल तर सकाळी उपाशी पोटी तुळशीची पाने चावावी. चवीने थोडे कडवट असतात, पण कारल्या सारखे कडू नसतात. त्यामुळे ते सहज खाऊ शकता. तुळशीचा चहा बनवण्यासाठी एक कप पाण्यात ५-७ तुळशीच्या पानांना टाकून उकळावे. हवे तर आपण यात तुळशीचे बीज, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस देखील घालू शकता. ते थंड किंवा हलके कोमट झाल्यास प्यावे.
*चयापचय वाढवतात*
तुळशीची पाने शरीरातील चयापचय वाढवतात. ही पाने खाल्ल्याने चयापचय मध्ये सुधारणा होते. यामुळे कॅलरी जलद बर्न होते. यामुळे अन्न ऊर्जे मध्ये बदलते. जेव्हा शरीराचे चयापचयाची क्रिया सुधारते तेव्हा वजन वेगाने कमी होते. यामुळे शरीरात जमलेली चरबी बर्न होते.
*☘️ तुळशीच्या पानांचे फायदे ☘️*
आयुर्वेदामध्ये तुळशीचे गुणधर्म सांगितले आहे, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चला बघू या तुळस आपल्यासाठी किती फायदेशीर आहे ते.
◆ तुळशीच्या पानात अँटी ऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीराची रोग प्रतिकारक क्षमतेला वाढविण्याचे काम करते.
◆ सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास खडी साखर, काळे मिरे आणि तुळशीच्या पानांना पाण्या मध्ये उकळवून काढा करावा नि त्याचे सेवन करावं, किंवा ह्या काढ्याचा घोळ वाळवून ह्याच्या बारीक गोळ्या बनवून खाल्ल्या मुळे सर्दी, पडसं आणि तापा मध्ये फायदेशीर आराम होईल.
◆ ज्यांच्या तोंडाला वास येतो त्यांनी दररोज सकाळी उठल्यावर तुळशीचे पान तोंडात ठेवायला हवे.असे केल्यास तोंडाच्या वास येणे कमी होते.
◆ शरीरावर कुठेही जखम झाल्यास तुळशीच्या पानांना तुरटी बरोबर जखमेवर लावल्याने जखम लवकर बरी होते.
◆ जुलाब लागल्यावर तुळशीच्या पानांमध्ये जिरे टाकून वाटून घ्यावे. या मिश्रणाला दिवसभरातून ३-४ वेळा चाटून घेणे. असे केल्यास जुलाब बंद होण्यात फायदाच होईल.
*☘️ तुळशीचा चहा नि फायदे ☘️*
तुळशीच्या चहा मधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा.
◆ तुळशी मधील अँटीऑक्सीडेंट्स त्वचेला सॉफ्ट आणि शायनी बनवण्यात मदत करते.
◆ तुळशीच्या चहा मधील फ्लेवोनॉइड्स कँसर टाळण्यात मदत करतात.
◆ हे प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.
◆ या चहा मध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. जे दमा टाळण्यात मदत करते.
◆ यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात, जे जॉइंट पेन टाळण्यात फायदेशीर असतात.
◆ तुळशीच्या चहा मध्ये व्हिटॅमिन-ए असते, जे डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यात मदत करते.
◆ ही चहा प्यायल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते. हे डायबिटीज पासून दूर ठेवण्यात मदत करते.
◆ तुळशीचा चहा कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते. हे हार्ट प्रॉब्लम टाळण्यात मदत करते.
◆ तुळसीच्या चहा मध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात, जे इंफेक्शन होऊ देत नाही.
◆ हा चहा प्यायल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
