भिवंडी पालिकेची धडक कारवाई 755 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, 20,000 हजार रूपे दंड..
पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील स्वच्छता मोहीम वर विशेष लक्ष केंद्रित केलेले असुन .स्वच्छता मोहीम, शहर सफाईचा एक भाग म्हणून सिंगल युज प्लास्टिक नियंत्रण शहरात कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून
पालिकेच्या वतीने प्रभाग समिती क्र 5 मधील महावीर एंटरप्रायझेस , मेट्रो ट्रेडर्स या दोन व्यापारी यांचेवर सिंगल यूज प्लास्टिक विक्री व वापर करताना दुकानावर धाडी टाकून एकूण 755 किलो वजन प्लास्टिक जप्त करून प्रत्येकी 10,000 हजार या प्रमाणे एकूण 20000/ रुपये दंड वसूल केला आहे तसेच परिसरातील पान टपरी येथे साफसफाई ठेवली नाही व ओला कचरा तसेच सुका कचरा साठी दोन डब्बे ठेवले नाही म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे याकामी सहाय्यक आयुक्त फैसल तातली प्रभाग आरोग्य निरीक्षक शशिकांत घाडगे, आरोग्य निरीक्षक उत्तम जाधव,रुपेश गायकवाड व सुमित कांबळे, अभिराज भालेराव व सर्व मुकादम यांनी ही जोरदार धडक कारवाई केली. व्यापारी, दुकानदार , फेरी विक्रेते तसेच नागरिकांनी सिंगल न्यूज प्लास्टिकचा वापर करू नये , अशा कारवाईत पकडले गेल्यास पहिले तीन वेळा दंडात्मक कारवाई व त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा सक्त इशारा पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे.
