*.*
************************
~~~~~~~~~~~~~~~
डॉ.रमीता राठोड 9167938743
मलेरिया हा एक प्राणघातक असा संसर्गजन्य रोग आहे. मलेरिया आजार हा एनोफिलिस जातीचा बाधित डास (Anopheles mosquito) चावल्यामुळे होत असतो. या बाधित डासात असणाऱ्या ‘प्लाजमोडियम परजिवीमुळे मलेरिया होत असतो. मलेरिया रोग हा हिवताप या नावांनेसद्धा ओळखला जातो. या लेखात मलेरिया होण्याची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
मलेरिया हा आजार कसा होतो. :
एनोफिलिस जातीचा बाधित डास चावल्यामुळे प्लाजमोडियम परजिवी हे त्या व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करतात. त्यानंतर ते परजीवी रक्त प्रवाहातून, यकृतात प्रवेश करतात व तेथे परजीवी आपली संख्या वाढवतात. त्यानंतर ते परजीवी त्या व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींला (RBC) बाधित करतात. अशाप्रकारे मलेरिया आजार होतो.
मलेरियाचे प्रकार :
प्लाज्मोडियम परजीवीच्या 4 प्रमुख जाती आहेत. यानुसार मलेरियाचे प्रकार होतात.
*(१)* प्लाज्मोडियम वायवॅक्स
*(२)* प्लाज्मोडियम ओवेल
*(३)* प्लाज्मोडियम फैल्सिपैरम
*(४)*) प्लाज्मोडियम मलेरी
प्लाज्मोडियम वायवॅक्स आणि ओवेल हे परजीवी ४८ ते ७२ तासापर्यंत RBC मध्ये राहतात. त्यामुळे ह्यामध्ये दर तीन दिवसांनी ताप येत असतो. प्लाज्मोडियम फैल्सिपैरम हा प्रकार जास्त धोकादायक असून यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक आहे.
मलेरियाची कारणे :
प्लाजमोडियम परजीवीने बाधित असणारा एनोफिलिस मादी डास चावल्यामुळे मलेरिया होत असतो. मलेरियास कारक असणारे प्लाजमोडियम परजीवी हे एनोफिलिस नावाच्या मादा डासांच्या लाळ ग्रंथीत राहतात. मलेरिया पसरविणारे डास साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी, अस्वच्छ ठिकाणी अधिक वेगाने वाढतात.
मलेरिया उपचार :
*(१)* मलेरियावर हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेणे आवश्यक असते. मलेरिया कोणत्या प्रकाराचा आहे त्यानुसार उपचार केले जातात. भारतामध्ये प्रामुख्याने वायवॅक्स मलेरीया हा प्रकार अधिक आढळतो. वायवॅक्स मलेरीया असल्यास क्लोरोक्वीनच्या गोळ्यांचा डोस तीन दिवस डॉक्टर देतील व त्यानंतर लिवरमधून प्लाज्मोडियम परजीवी नाहीसे करण्याकरीता प्रायमाक्यवीन गोळीचा कोर्स १४ दिवस दिला जाईल. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर नियमितपणे घेणे आवश्यक असते.
*(२)* फाल्सीपेरम मलेरीयाही काही प्रमाणात भारतात आढळतो. फाल्सीपेरम मलेरीया असल्यास रुग्णांना क्लोरोक्वीनची गोळी देऊ नये. यामध्ये ACT (Arctsunate combination therapy) च्या गोळीचा कोर्स 3 दिवस घेणे आवश्यक आहे, कारण फालसीपेरम मलेरीया हा मेंदूपर्यंत जाऊन प्राणघातक ठरू शकतो. म्हणून हिवतापाची लागण झालेल्या रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण औषधोपचार करून घ्यावा.
