Pain Killer मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने थांबतात

लेख

**

वेदना होत असतील तर त्या टाळण्यासाठी आपण लगेच पेनकिलर घेतो. अनेकदा डॉक्टरही आपल्याला पेनकिलर घेण्याचा सल्ला देतात. पेनकिलर घेतल्याबरोबर वेदना त्वरित नाहीशा होतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, पेन किलरमध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने वेदना तातडीने नाहीशा होतात?
मुळात, जेव्हा आपल्याला दुखापत होते, तेव्हा आपल्या शरीरातील सिग्नल थेट मेंदूला जातो, जो आपल्याला संदेश देतो की आपल्याला वेदना होतायत. ज्यामुळे आपल्याला वेदना जाणवते. मुख्य म्हणजे, वेदना होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यामुळे दुखापत झाली आहे किंवा आपल्याला काही धोका याचे संकेत देतात.

*दुखापतीला कसं कमी करतात पेनकिलर औषधं?*
पॅरासिटामॉल किंवा ब्रुफेन सारखी औषधं या वेदना एका खास पद्धतीने कमी करतात. जेव्हा आपल्याला दुखापत होते तेव्हा आपल्या शरीरात अशी अनेक रसायनं तयार होतात ज्यामुळे आपल्याला वेदना होतात. अशा परिस्थितीत, शरीर जखमी ठिकाणी अधिक रक्त पोहोचवू लागतं.

*केमिकलमुळे वेदना आणि जळजळ होते*
रक्तामध्ये पांढऱ्या रक्त पेशी देखील असतात ज्याचा उपयोग जखम बरा करण्यासाठी केला जातो. या पांढऱ्या रक्तपेशींसोबतच अनेक रसायनंही दुखापतीच्या ठिकाणी पोहोचतात. या प्रमुख रसायनांपैकी एकाचं नाव प्रोस्टॅग्लॅंडिंग आहे. या रसायनामुळे वेदना आणि जळजळ होते.

*औषधं कशी काम करतात?*
जेव्हा तुम्ही ही औषधं घेता तेव्हा ती हळूहळू तुमच्या रक्तात मिसळतात आणि दुखापतीच्या ठिकाणी तसंच मेंदूपर्यंत पोहोचतात. दोन्ही ठिकाणी, ते वेदना कमी करण्यासाठी हे रसायन तयार होण्यापासून रोखतात, जेणेकरून मेंदू आपल्याला वेदना होत असल्याचे संकेत देत नाही.
वरील महिती वरून एक गोष्ट तर लक्षात येते की पेनकिलर जखम किंवा वेदना यावर औषध नाही, तर ते तात्पुरते आपल्याला म्हणजे मेंदूला त्याच्या कामापासून दुर ठेवते व वेदना होणाऱ्या जागी जे रसायन पोहचते त्यात अडथळा निर्माण करते. परंतु अश्याने वेदना होणाऱ्या भागास आणखीनच नुकसान होते.
म्हणुन सतत पेनकिलर घेणें हे, आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे व पेनकिलर च्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्या…
टीप:- वरील महिती ही प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्स च्या आधारे आहे.
अशी प्रत्येक आजारावर माहिती आरोग्यविषयक माहितीसाठी संपर्क

डॉ. रमिता राठौड़ 9167938743

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *