अनधिकृतपणे दगडाचे उत्खनन करून गौण खनिजाची चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चार गावातील तिघांवर महसूल विभागाने कारवाई करीत ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कालवार, कारीवली,नारपोली,राहनाळ या चार गावच्या हद्दीत गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश तहसीलदार अधिक पाटील यांनी दिले होते.त्यानुषंगाने खारबाव मंडळ अधिकारी सुधाकर गोपाळ कामडी,तलाठी सझा कामतघर सिद्धी पातकर,पोलीस पाटील वैभव केशव पाटील व पंच योगेश गोपीनाथ पाटील आदी १४ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास वरील चार गावच्या हद्दीत गस्त करीत असताना तिघांनी २ पोकलन मशीन व हवा दबाव यंत्राच्या सहाय्याने दगड उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील व पंचांच्या मदतीने गौण खनिजाच्या चोरीसाठी वापरलेले ४६ लाख रुपये किमतीचे पोकलन व हवा दबाव यंत्र जप्त केले.तर पोलिसांची कुणकुण लागताच चालकांनी घटनस्थळावरून पळ काढला आहे.त्यामुळे तिघांवर नारपोली पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७९,५११,३४ न्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास नारपोली पोलीस करीत आहेत.
