गांवकरी TODAY NEWS
टोरेंट पॉवरने ११ डिसेंबर रोजी पडघा परिसरातील कुरुंद गावातील आदर्श विद्यालय मराठी शाळेत “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” या विषयावर जनजागृती सत्र आयोजित केले होते. या जनजागृती सत्रात शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांसह सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. या सत्रासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये खूप उत्साह होता.दरम्यान या सत्रात अनेक विद्युत सुरक्षा उपदेश आणि ऊर्जा संवर्धन पद्धती सामायिक केल्या गेल्या. सत्रानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.टोरेंटच्या या उपक्रमासाठी शाळेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तर शाळांमध्ये असे सत्र आयोजित करण्यामागे टोरेंट पॉवरचा उद्देश मुलांमध्ये वयाच्या प्राथमिक टप्प्यात विद्युत सुरक्षा सवयी लावणे असून याप्रकारचे सत्र महिनाभरापूर्वी ब्राह्मण आळीतील एन.ई.एस.इंग्रजी माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आले होते.तसेच टोरेंट विविध शाळांमध्ये अशा प्रकारचे सत्र सुरू ठेवणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी दिली आहे.
