भिवंडी दि.२६ ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील जनरल स्टोर्समध्ये राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाल्याचे पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या एकावर नारपोली पोलिसांनी कारवाई करून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.अब्दुल मज्जीद अब्बास (३९) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मानकोली नाका येथील बाबा जनरल स्टोर्समध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचे पदार्थाची विक्रीसाठी साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती,त्यानुषंगाने नारपोली पोलिसांनी २३ ऑक्टोबर रोजी बाबा जनरल स्टोर्स येथे रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता,विविध कंपनीचे १८ हजार रुपये किमतीचा गुटखा व पानमसाल्याचे पदार्थाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.तर अब्बास याच्या विरोधात पोह मिलिंद हरि पवार यांच्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.त्यास न्यायालयात हजर केले असता २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास सपोनि शरद पवार करीत आहेत.
