भिवंडी दि.२० ( गांवकरी TODAY NEWS ) १२ जणांनी आपसात संगनमत करून ठाण्यातील माजीवडा येथील कपडा व्यापाऱ्याकडून कपड्याचा माल घेऊन त्याला खोट्या सह्यांचे चेक देवून सव्वा दोन कोटींची फसवणूक केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.या फसवणूक प्रकरणी १२ जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सौरभ कुमार अग्रवाल,जॉन टेलर डे,मयांक तिवारी,सुप्रिया मुन्शी,मुकेश शर्मा,ऋची त्रिपाठी,ऋषिकांत पासवान,विक्रांत कुमार,दास राजदीप सुप्रम,सजीत नारायणण,अंकुश मिश्रा,गगणदीप सैनी अशी गुन्हा दाखल झालेल्या १२ जणांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून श्रीराम किसनस्वरूप गोयल या कपडा व्यापाऱ्याकडून २ कोटी २५ लाख ३९ हजार ६२६ रुपये किंमतीच्या कपड्याच्या मालाची खरेदी करून ते ९ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान कशेळी येथील राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्समधून ‘टॉपमेन इंटरनॅशनल’ या कंपनीचा माल घेऊन गेले होते.परंतु व्यवहाराच्या वेळी या सर्वांनी आपसात संगनमत करून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नसतानाही श्रीराम यांना सव्वा दोन कोटींचा खोट्या सह्यांचा चेक देवून त्यांची फसवणूक केली.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रीरामने गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी नारपोली पोलीस ठाणे गाठून १२ जणांच्या विरोधात तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोऊनि रोहन शेलार करीत आहेत.
