मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांना चौघांकडून मारहाण

भिवंडी


भिवंडी दि.,14( गांवकरी TODAY NEWS ) मुंबई येथील मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या भिवंडीतील दोघा मित्रांना चौघांनी आपसात संगनमत करीत हाताच्या चापटीसह चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना मुंबईतील कुर्ला पूर्वेतून समोर आली आहे.या मारहाणीचा चौघांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोमल,प्रशांत व त्यांचे अन्य दोन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मित्रांची नावे आहेत.कोनगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी आदित्यराज राजमली गौतम (१७) हा मूळचा उत्तरप्रदेशमध्ये राहणारा असून सद्यस्थितीत तो भिवंडीतील पिंपळघर येथे राहत असून त्याचे ओम पेट्रोल पंपासमोर पंक्चरचे दुकान आहे.दरम्यान त्याची मैत्रीण शालू जस्वाज (१८) ही मुंबईतील कुर्ला पूर्वेत राहत असल्याने आदित्यराज तिला भेटण्यासाठी त्याचा मित्र अभय सिंग याच्यासोबत ११ ऑक्टोबर रोजी रात्री पाऊणे आठ वाजताच्या सुमारास गेला होता.त्यावेळी आदित्यराज आणि शालू गप्पा मारत असताना शालूची मैत्रीण कोमल व तिचा मित्र प्रशांत आणि त्यांचे अन्य दोन साथीदार घटनास्थळी आले असता,कोमलने अभयसिंग यास हाताच्या चापटीने मारहाण केली.त्यानंतर प्रशांत व त्याच्या सोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांनी आदित्यराजला शिवीगाळ करीत त्याच्या पाठीवर,खांद्यावर,कमरेवर तसेच पायावर धारदार चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले आहे.याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात आदित्यराजच्या फिर्यादीवरून चौघांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३२६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि कडलग करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *