भिवंडीत वाहनांची चोरी ; अज्ञातांवर गुन्हा

भिवंडी


भिवंडी दि.११ ( गांवकरी TODAY NEWS ) शहरात वाहन चोरीच्या आलेखामध्ये वाढ होत असतानाच आणखी ४ वाहने चोरीस गेल्याच्या घटना वेगवेगळ्या परिसरातून उघडकीस आल्या आहेत.याप्रकरणी चार पोलीस ठाण्यांत अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील पहिल्या घटनेत कामतघर परिसरातील पुनम देशी बार समोरील गणेश मंदिराजवळ पार्क करून ठेवण्यात आलेली २५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची फॅशन प्रो दुचाकी अज्ञात चोरट्याने ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास चोरून नेली आहे.याप्रकरणी सनीदेओल मिठाईलाल गौड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या घटनेत हिंदुस्थान मस्जिदीजवळील भुसार मोहल्ल्यातील तेलाचे होलसेल व्यापारी शायान अब्दुल समद मोमीन यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची एक्सेस स्कूटर बिल्डिंगखाली पार्क करून ठेवली असता अज्ञाताने चोरून नेली आहे.या चोरीचा अज्ञात चोरट्यावर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिसऱ्या घटनेत काल्हेर येथील आशा रुग्णालया जवळील जय माता दी कंपाउंड समोर अरशद दयानंद भोईर ह्याने त्याची ३० हजार रुपये किमतीची बर्गमॅन दुचाकी ९ ऑक्टोबर रोजी पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.याप्रकरणी अज्ञातावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर चौथ्या घटनेत
विकी राजेश सोनार ह्याने २६ सप्टेंबर रोजी रांजणोली रोडलगतच्या सँडी धाब्याचे बाजुला त्याची २० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.या कार चोरीचा गुन्हा अज्ञात चोरट्याच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे.या वाहन चोरीच्या घटनांमुळे तालुक्यातील वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *