भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) संपूर्ण देशभरात सर्वत्रच १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.दरम्यान या सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे वनविभागाच्या अखत्यारीत वनपरिक्षेत्र पडघा आणि वन परिमंडळ किरवली यांच्या संयुक्त विद्यमाने पडघा परिसरातील खंबाळा येथील विभागीय माध्यमिक शाळेत ४ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना वन्यजीवांबद्दल माहिती व्हावी,यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला प्रवक्ते म्हणून उपस्थित असलेले सर्पमित्र गोपाळ दीक्षित यांनी वन्यजीव संरक्षणासह सर्प हाताळणे,तसेच विषारी व बिनविषारी सापांबद्दल अतिशय सोप्या भाषेत माहिती देवून मोलाचे मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्पांच्या प्रजातींचे छायाचित्रांचे प्रदर्शनही दाखवण्यात आले.यावेळी किरवली वनपाल मंगेश शिंदे,वडपा वनपाल प्रवीण आव्हाड,पाच्छापूर वनपाल दिनेश फर्डे,कोशिंबे वनरक्षक सी .पी. पोटे,लोनाड वनरक्षक अमोल खुडे, मांडा टिटवाळा विद्यामंदिर शाळेचे सहशिक्षक, विभागीय हायस्कूल खंबाळाच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम व त्यांचे सहकारी सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमास उपस्थित होते.
