भिवंडी: स्वच्छ भारत 2023 अंतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता ही सेवा कार्यक्रम राबविण्यात आला. स्वच्छ भारत उपक्रमात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. या मध्ये ज्या सोसायट्या चांगल काम करतात त्यांचा देखील प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो. 2 ऑक्टोंबर गांधी जयंतीचे औचित्य साधत पालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपायुक्त दीपक झिंजाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सार्वजनिक आरोग्य अधिकारी जयवंत सोनावणे, सहायक आयुक्त नितीन पाटील , शोचालय व्यवस्थापन अधिकारी गिरीश घोष्टेकर, जन संपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.
स्वच्छ भारत उपक्रमात चांगल काम करणाऱ्या शहरातील मान सरोवर परिसरातील सोम शिवम सोसायटी, इस्कॉन मंदिर यांना ओला कचरा सुका कचरा चांगल्या प्रकारे विलगी करण करण्याचं चांगल काम केल्याबद्दल गौरविण्यात आले, तर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रकारे प्रचार प्रसार करण्यासाठी
पथ नाट्य सादरीकरण याकामी
सिस्टर निवेदिता शाळा यांना प्रथम, भिवंडी मनपा शाळा नंबर 45 द्वितीय, शाळा नंबर 34 तृतीय, तर शाळा नंबर 33 उतेजनार्थ बक्षीस देऊन पालिका उपायुक्त दीपक झिंजाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांनी ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून द्यावा असे आवाहन पालिका उपायुक्त दीपक झिंजाड यांनी केले.
