राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जयंतीनिमित्त साधून महापालिकेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालिका आरोग्य विभाग उपायुक्त दीपक झिंजाड यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस, तसेच मंडई येथील महात्मा गांधी यांचे अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी सहायक आयुक्त नितीन पाटील, राजेंद्र वरलीकर, सार्वजनिक आरोग्य अधिकारी जयवंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, शौचालय व्यवस्थापन अधिकारी गिरीश घोष्टेकर, वाचनालय विभाग प्रमुख नेहाला मोमीन, अन्य अधिकारी , कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
