भिवंडी : दि.26 सप्टेंबर ( गांवकरी TODAY NEWS )
देशातील सर्व जनतेवरील विघ्न दूर व्हावे,तसेच राज्यात काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांची वाताहत होऊ नये असा आशीर्वाद गणपती बाप्पाने द्यावा अशी प्रार्थना आपण गणराया चरणी केल्याची प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले आहे.
ते भिवंडीत एकात्मतेचा राजा म्हणून गौरवल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी,
भाजपा शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील,
पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,
सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख,उपायुक्त दीपक झिंजाड,माजी सभागृह नेते सुमित पाटील,भाजपा
माजी गटनेता हनुमान चौधरी,भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विठ्ठल नाईक,अखिल पद्मशाली समाज अध्यक्ष रामकृष्ण पोट्टाबत्तीनी आदी मान्यवर उपस्थित होते.
धामणकर नाका मित्र मंडळाने
गणेशोत्सवाच्या निमित्ताने उभारलेल्या भव्य श्री महामृत्युंजय मंदिराच्या पर्यावरण सजावटीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.तर या निमित्त राबविण्यात येणारे विविध समाजोपयोगी उपक्रम तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी फलकांद्वारे प्रकाशित करण्याची संकल्पना राबविल्या बद्दल त्यांचे सुध्दा कौतुक केले .
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भेट देत गणरायाची पूजा अर्चना केली .तर यानिमित्त तीन गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवण यंत्र भेट देण्यात आले.