भिवंडी दि.20 ( गांवकरी TODAY NEWS ) बँकेतून पैसे काढून घरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली असता,झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील अंजुर फाटा परिसरातून उघडकीस आली आहे.याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,४ जुलै २०२३ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास भिवंडी – ठाणे रोडवरून अनिता राजू डाखोरे ह्या अँसिस बँकेतून पैसे काढून त्यांच्या मानकोली येथील राहत्या घरी जाण्यासाठी रिक्षा स्टँडजवळ रस्त्याने पायी चालत निघाल्या होत्या.त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या ट्रक क्र.एमपी ०९-एचजी-९७३७ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अनिता यांना पाठीमागून जोरात ठोकर मारली.त्यामुळे अपघात होऊन अनिता ह्या रस्त्यावर खाली पडल्या.त्यानंतर ट्रकचा डाव्या बाजूचा पुढील चाक त्यांच्या उजव्या पायाच्या पंजावरून जाऊन ट्रकचा मडगार्ड डाव्या पायाला लागून अनिता गंभीर जखमी झाल्या आहेत.दरम्यान घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.या अपघात प्रकरणी १६ सप्टेंबर रोजी अनिताच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात भादविच्या २७९ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.पुढील तपास पोना तडवी करीत आहेत.
