‘त्या’ ३३ लाखांच्या दरोड्याप्रकरणी आरोपींना कारावासासह न्यायालयीन दंडवास

भिवंडी


भिवंडी दि.१८ ( गांवकरी TODAY NEWS ) १२ सप्टेंबर २०१६ रोजी भिवंडी तालुक्यातील मालोडी टोलनाक्याच्या रक्कमेचा नालासोपारा येथे राहणारे घनश्याम बाबूलाल तिवारी हे बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना ७ दरोडेखोरांनी आपसात संगनमत करून कारीवली -कालवार गावच्या हद्दीत त्यांच्या कारसमोर टेम्पो आडवा घालून घनश्याम यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी करून रोख रक्कम ३३ लाख रुपयांची रोकड दरोडा टाकून चोरून नेली होती.त्यानंतर घनश्याम यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांवर भादविच्या कलम ३९५,३९७,३४१ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासिक अधिकारी सपोनि राजीव पाटील आणि पोह जयसिंग राठोड यांच्यासह पोलीस पथकाने तांत्रिक पध्दतीने शिताफीने तपास करून गुन्ह्यातील ७ दरोडेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली होती.रवि अशोक प्रजापति,कल्पेश आग्याराम वर्मा,जीगर रामआश्रय हरिजन,जस्सीम लालमोहमद अन्सारी,मोहंमद नसरूद्दीन आक्रम खान,मोहंमद समीर गुड्डू उर्फ आक्रम अन्सारी,राजुप्रसाद उर्फ टारझन रामखिलावन विश्वकर्मा अशी अटक करण्यात आलेल्या ७ दरोडे खोरांची नावे आहेत.त्यानंतर सबळ पुराव्यांसह न्यायालयात आरोपींच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.तर तब्बल ७ वर्षांनी १४ सप्टेंबर २०२३ रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश पी.एम.गुप्ता सुनावणीवेळी ४ आरोपींना दोषी ठरवून शिक्षेसह दंडवास ठोठावला आहे.तर तिघांना सर्वसाधारण शिक्षा ठोठावून बॉंडवर सोडण्यात आले आहे.यामध्ये रवि प्रजापती,कल्पेश वर्मा आणि मोहमद समीर गुड्डू या तिघांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड स्वरूपात भरण्याचे आदेश देवून ५ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.तर राजूप्रसाद उर्फ टारझन यास ७ वर्षांच्या कारावासासह ५ हजार रुपये दंड स्वरूपात भरण्याची शिक्षा देण्यात आली आहे.न्यायालयात पोलिसांच्या वतीने सरकारी पक्षकार वकील वर्षा चंदने यांनी हा खटला चालवला.यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टात बी.व्ही.ओव्हाळ यांनी पैरवी अंमलदार म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *