श्री अंबिका योगाश्रम लाखिवली येथे वृक्षारोपण

भिवंडी


भिवंडी दि.१३ ( गांवकरी TODAY NEWS ) तालुक्यातील लाखिवली गावात नियमित सुरु असलेल्या “श्री अंबिका योगाश्रम ” मध्ये योगाभ्यास करताना प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे आणि निसर्गाच्या स्नानिध्यात योगाचा आनंद नागरिकांना मिळावा,यासाठी शहरातील सामाजिक संस्थांद्वारे वृक्षारोपण करण्यात आले.यासाठी योगाभ्यास करणाऱ्या महिला-पुरुषांनी उस्फुर्त सहभाग घेतला.शहरातील लायन्स क्लब, दादासाहेब दांडेकर विद्यालय, टिळक चौक मित्र मंडळ,सह्याद्री पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील लाखिवली गावात “श्री अंबिका योगाश्रम ” येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्री अंबिका योगाश्रमचे संचालक विनायक भाई व किरण प्रजापती यांच्या सह मान्यवरांच्या शुभहस्ते भू-मातेचे व तुळसीचे पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी योगाश्रमाच्या आवारात हापूस व केशर आंबा, फणस, आवळा, कांचन,रिठा, हिरडा, चंदन, बेहडा,शिकेकाई इ.फळझाडे व औषधी वनस्पतींच्या एकूण १५० रोपांची लागवड करण्यात आली आहे.हा पर्यावरण स्नेही प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती सभापती प्रमोद पाटील, लायन्स क्लब भिवंडीचे अध्यक्ष सुधीर देशमुख,शितल देशमुख,सह्याद्री पतपेढीचे उपाध्यक्ष अरूण पाटील,स्नेहा कारेकर व टिळक चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामदास पाटील,मिलिंद पळसुले पदाधिकारी तसेच दादासाहेब दांडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *