भिवंडी महापालिकेतर्फे मिशन इंद्रधनुष्य टप्पा दोनची सुरवात

भिवंडी


भिवंडी दि.१२ ( गांवकरी TODAY NEWS ) शहर महानगरपालिकेच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत राष्ट्रीय लसीकरण मोहीम टप्पा दोन ११ ते १७ सप्टेंबर २०२३ रोजी दरम्यान राबवण्यात आला आहे.या इंद्रधनु लसीकरण मोहिमेची सुरवात सोमवारी पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते शहरातील जैतनपुरा परिसरातील एका बालकाला लस पाजून करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.बुशरा सय्यद, डॉ.प्रिया फडके पाटील, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सर्व भिवंडी वासियांना आवाहन केले की, शहरामध्ये लसीकरण इंद्रधनू मोहीम टप्पा दुसरा सुरू करण्यात आलेला आहे.या दरम्यान शहरात पालिकेचे कर्मचारी आपल्या घरी येऊन आपल्या बालकाला लस देणार आहेत.तरी आपल्या घरातील शून्य ते पाच वयोगटातील बालकाला लस देऊन त्याला भविष्यात कोणतेही आजार होणार नाहीत याची दक्षता पालकांनी घ्यायची आहे.त्यामुळे या लसीकरण उपक्रमात महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन देखील पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.तर यावेळी पथनाट्याद्वारे लसीकरण मोहीमेची जनजागृती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *