सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या ; पतीसह ५ जणांवर गुन्हा

भिवंडी


भिवंडी दि.११ ( गांवकरी TODAY NEWS ) सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी मयत पीडितेच्या भावाच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात पतीसह ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती सुनिल रामअवतार गोंड,सासरा रामअवतार गोंड,सासू लीलावती देवी गोंड,दिर सुधिर गोंड,नणंद गुंजन गोंड अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्यांची नावे आहेत.तर कविता सुनील गोंड असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या मयत विवाहितेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत पीडितेचे भिवंडीतील सुनिल गोंड याच्याशी सन २०१२ मध्ये लग्न झाले आहे.व ती सासरच्यांसह टेमघर येथील स्वयंसिद्धी कॉलेज परिसरातील स्काय गार्डनमधील घर क्र.३०३ मध्ये राहत होती.दरम्यान सासरच्या सर्वांनी आपसात संगनमत करून पीडित मयत विवाहितेला तिने माहेरहून हुंड्यात मोटारसायकल आणावी,यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू ठेवला होता.यासह सासू,सासऱ्याने पीडितेला रक्षाबंधन सणाला माहेरी जाण्यास नकार दिला होता.त्यामुळे या सासरच्या जाचाला कंटाळून पीडित विवाहितेने अखेर ६ सप्टेंबर २०२३ रोजी सासरी राहत्या घरातील बेडरूममधील छताच्या लोखंडी हुकास साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.तर या आत्महत्येस विवाहितेला सासरच्यांनी प्रवृत्त केल्या प्रकरणी मयत पीडितेचा भाऊ भरतकुमार रघुनाथ प्रसाद गोंड याच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात ५ जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोऊनि बी.बी.गव्हाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *