पत्नीसह मुलीला रिक्षातून सोडल्याच्या रागातून पतीची चालकाला मारहाण

भिवंडी


भिवंडी दि.11 ( गांवकरी TODAY NEWS ) रिक्षा चालकाने रात्रीच्या वेळी त्याच्या परिचित विवाहित महिलेसह तिच्या मुलीला रिक्षातून राहत्या गावात सोडल्याने विवाहितेच्या पतीने या गोष्टीचा मनात राग धरून जाब विचारत चालकाला शिवीगाळ करीत लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना खोणी गावात घडली आहे.याप्रकरणी रिक्षा चालकाच्या फिर्यादीवरून आरोपी पतीवर निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा परदेशी (३२) असे आरोपी पतीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास काटई गावातील रिक्षा चालक उमेश लक्ष्मण बाळशंकर यास त्याच्या ओळखीची खोणी गावातील विवाहित महिला व तिची लहान मुलगी छत्रपती शिवाजी चौकात दिसल्याने त्याने दोघांना रिक्षातून खोणी गावात सोडले.परंतु त्यावेळी रिक्षाचालक उमेश यास महिलेचा पती कृष्णाने त्याच्या पत्नी व मुलीला रिक्षातून सोडताना बघितले.त्यामुळे याच गोष्टीचा राग मनात धरून कृष्णाने उमेशला दमदाटी करून जाब विचारत शिवीगाळ करीत लाकडी दांड्याने लक्ष्मणच्या पायावर उप्पट मारून त्यास जखमी केले आहे.याप्रकरणी रिक्षाचालक उमेशच्या फिर्यादीवरून निजामपूरा पोलीस ठाण्यात कृष्णाच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास सीआरपीसी ४१ (१),(अ) प्रमाणे नोटीस देवून सोडण्यात आले आहे.पुढील तपास पोऊनि व्ही.टी. पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *