भिवंडी दि.5 ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडीत नुकत्याच १ सप्टेंबर रोजी महाविकास संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘त्या’ ३७ मोर्चेकरी सदस्यांवर पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये माजी खासदारांसह,माजी आमदार,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेतेमंडळीचाही सामावेश आहे.काँग्रेसचे अब्दुल सलाम शेख,शिवसेना माजी आमदार रुपेश म्हात्रे,काँग्रेस माजी खासदार सुरेश टावरे,रशीद ताहीर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शोएब खान गुड्डू,ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रसाद पाटील,मनोज गगे,शरद पाटील,विजय कांबळे,राम लहारे,विश्वास थळे,दर्शना मढवी,जावेद फारुकी,प्रतीक चंगलानी,अरुण पाटील,तुफेल फारुकी,प्रदीप भोई,पंकज गायकवाड,मतलुब सरदार, जयमाला पाटील,बबलू अन्सारी,जाहिद अन्सारी,अरविंद म्हात्रे,हलीम अन्सारी,जाकीर मिर्झा,अबुसुफियान शेख, भाऊ काठवले,इस्माईल खान,रसूल खान,वारीस शेख,परवेज मोमीन,मदन भोई,नसीम खान,राज पाटील,संदीप म्हात्रे,रवीश मोमीन,दुर्गेश नाईक अशी गुन्हा दाखल झालेल्या ३७ जणांची नावे आहेत.१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळपर्यंत भिवंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महापालिका मुख्यालयासमोर महासंघर्ष समितीच्या वतीने टोरेंटच्या वाढत्या मक्तेदारी विरोधात मोर्चा काढला होता.परंतु या मोर्चाला पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी परवानगी नाकारली होती.असे असतानाही या सर्वांनी पोलीस उपायुक्तांच्या आदेशाची अवहेलना करत मोर्चा काढला.त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात पोह नवसु लक्ष्मण फुफाने यांच्या फिर्यादीवरून वरील सर्वांवर भादविच्या १८८,३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (३) १३५ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
